वाचा-
आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मॉर्गनने १२६.१९च्या स्ट्राइक रेटने १०६ धावा केल्या. त्याने टॉम बॅटमसह चौथ्या विकेटसाठी १४६ धावा केल्या. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४९.५ षटकात ३२८ धावा केल्या.
वाचा-
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मॉर्गनने मारलेल्या षटकारांची संख्या २१३ इतकी झाली आहे. वनडेमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार ()च्या नावावर होता. धोनीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २११ षटकार मारले आहेत. आता हा विक्रम मॉर्गनच्या नावावर झाला. या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग असून त्याने १७१ षटकार मारले आहेत.
वाचा-
मॉर्गनने आयर्लंड विरुद्ध फक्त ८४ चेंडूत १५ चौकरा आणि ४ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. वनडे क्रिकेटमधील हे त्याचे १४वे शतक ठरले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ३२८ धावा उभ्या केल्या. इंग्लंडकडून वनडेत सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मॉर्गन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर जो रुट असून त्याने १६ शतक केली आहेत.
कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
इयान मॉर्गन(इंग्लंड)- १६३ सामन्यात २१३ षटकार
महेंद्र सिंह धोनी (भारत)- ३३२ सामन्यात २११ षटकार
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया)- ३२४ सामन्यात १७१ षटकार
ब्रॅडम मॅकलम (न्यूझीलंड)- १२१ सामन्यात १७० षटकार
एबीडी व्हिलियर्स (दक्षिण आप्रिका)- १२४ सामन्यात १३५ षटकार
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.