IPL Highest Average Record :  आयपीएल च्या सोळाव्या हंगमाला दिमाखात सुरुवात झाली. आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक विक्रम झाले. सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार यासारखे अनेक विक्रम तुम्ही वाचले असतील. पण सर्वात कठीण काम असते.. धावांचा पाठलाग करणे… धावांचा पाठलाग करताना अनेक दिग्गजांना घाम फुटतो.. पण आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात चांगली सरासरी कोणत्या फलंदाजाची आहे… तुम्हाला माहितेय का? या यादीत विराट कोहली आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  विराट कोहली याच्यासारखा धावांचा यशस्वी पाठलाग कुणीच करत नाही. विराट कोहलीला त्यामुळे चेजमास्टर म्हटले जाते. पण आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये विराट कोहलीचे नाव नाही.. तर धावांचा पाठलाग यशस्वी करणाऱ्या आयपीएलमधील फलंदाजाबद्दल पाहूयात.. 

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना कमीतकमी एक हजार धावा किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये विराट कोहलीचे नाव नाही. यामध्ये भारताच्या एका फलंदाजाचे नाव आहे. केएल राहुल.. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या यशस्वी फलंदाजामध्ये केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.  पण पहिल्या क्रमांकावर कोण? पहिल्या क्रमांकावर गुजरातचा डेविड वॉर्नर आहे. गुजरात संघाच्या यशामध्ये डेविड वॉर्नर याचा सिंहाचा वाटा आहे. गुजरातने आतापर्यंत ११ सामन्यात दहा सामने धावांचा पाठलाग करुन जिंकले आहेत. यामध्ये डेविड मिलर याचा मोठा वाटा आहे. ते आकडेवारी पाहिल्यास स्पष्ट होतेय.  

धावांचा पाठलाग करताना आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी डेविड मिलर आहे. डेविड मिलर याने धावांचा पाठलाग करताना 54.63 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. डेविड मिलर आयपीएलमधील चेज मास्टर आहे. डेविड मिलरनंतर या यादीत भारताचा केएल राहुल याचा क्रमांक लागतो. धावांचा पाठलाग करताना केएल राहुल जवळपास ५२ च्या सरासरीने धावा काढतो. आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये राहुल एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शॉन मार्श आहे.  लक्षाचा पाठलाग करताना शॉन मार्श जवळपास ४३ च्या सरासरीने धावा काढत होता.  त्यानंत यादीत आणखी एका ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाचे नाव आहे. डेविड वॉर्नर… लक्षाचा पाठलाग करताना जवळपास ४२ च्या सरासरीने धावा काढतो..त्यानंतर जोस बटलर याचा क्रमांक लागतो. जोस बटलर सध्या तुफान फॉर्मात आहे. प्रथम फलंदाजी करताना ज्याप्रमाणे बटलर खेळतो, त्याच प्रमाणे दुसऱ्या डावातही बटलर धावांचा पाऊस पाडतो. बटलर जवळपास ४० च्या सरासरीने धावा काढतो. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर धावांचा पाठलाग करताना ३९.२८ च्या सरासरीने धावा काढतो. तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 

sports

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here