नवी दिल्ली: आयर्लंडच्या क्रिकेट संघाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध सनसनाटी विजय मिळवला. वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ३२९ धावांचे लक्ष्य दिले होते. आयर्लंडने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासात हा विजय नेहमी लक्षात ठेवला जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला असला तरी आयर्लंडने या एका विजयात अशी काही कामगिरी केली आहे जी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघांना करता आली नाही.

वाचा-
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या वनडेत पॉल स्टर्लिंग आणि बालबर्नी यांनी शानदार शतकी खेळी केली आणि संघाला ७ विकेटनी विजय मिळवून दिला. इंग्लंडने इयान मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर ३२८ धावा उभ्या केल्या पण विजयाचे लक्ष्य आयर्लंडने पार केले. इंग्लंडचा खेळ पाहता ते मालिका ३-० अशी खिशात घालतील असे वाटले होते. पण आयर्लंडने बाजी पलटवली. त्यांनी ४९.५ षटकात ३ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. स्टर्लिंगने १४२ तर बालबर्नीने ११३ धावा केल्या. विशेष म्हणजे आयर्लंडचा हा इंग्लंडच्या भूमीवरील पहिला विजय आहे.

वाचा-
इंग्लंडविरुद्ध जागतिक क्रिकेटमध्ये ३२० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य असताना विजय मिळवण्याबाबत आयर्लंडने भारतीय संघाशी बरोबरी केली आहे. भारताने अशी कामगिरी आतापर्यंत दोन वेळा केली. आयर्लंडने मंगळवारी मिळवलेल्या विजयासह या यादीत भारतासोबत स्थान मिळवले. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांना मागे टाकले. या तिनही संघांनी आतापर्यंत एक वेळा इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला आहे.

आयर्लंडचा संघ इंग्लंडमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवणारा संघ ठरला आहे. याआधी भारतीय संघाने २००२ साली नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ३२६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

वाचा-
वनडे क्रिकेटचा विचार केल्यास या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००६ साली ४३८ धावांचे टार्गेट पार केले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर देखील आफ्रिकेचा संघ आहे. त्यांनी २०१६ विरुद्ध पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच ३७२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून त्यांनी २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३६४ धावा केल्या होत्या. या यादीत भारत चौथ्या स्थानावर असून, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६२ धावा करत विजय मिळवला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here