गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत.
भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगट आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आज बबिताने पुन्हा एकदा राम मंदिराबाबत एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. बबिताला यावेळी काही जणांनी ट्रोलही केले आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची कोनशिला स्थापन केली. त्यावेळी बबिताने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये, ‘अयोध्या तो झांकी है उसके, बाद भी बहुत कुछ बाकी है’ असे तिने म्हटले आहे.
तब्बल २ लाख ७५ हजार विटांतील १०० विटांवर ‘जय श्रीराम’ असं कोरलेलं आहे. यातील नऊ विटा पूजेत सामील करण्यात आल्या आहेत. मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल हेदेखील पूजेसाठी उपस्थित होते. दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केलं.
इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. श्रीरामांना खारीसहीत वानर, केवटच्या वनवासी बंधुंची सोबत मिळाली होती. ज्या पद्धतीनं दलित, मागासवर्गीय, आदिवासी अशा प्रत्येक वर्गानं स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींना साथ दिली होती…. त्याच पदधतीनं सर्वांच्या सहकार्यानं राम मंदिराचं निर्माण होतंय, असं मोदी यांनी यावेळी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I really like and appreciate your blog post.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.