राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर भारतामध्ये संमिश्र वातावरण आहे. काही जणं या गोष्टीमुळे आनंदीत झालेले आहेत, तर काही जणांनी या करोनाच्या काळात ही गोष्ट करायला हवी होती का, हा प्रश्नही उपस्थित केला आहे. कैफ तर अलाहाबादमध्येच राहतो, त्यामुळे या सर्व गोष्टी त्याने जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घेऊया…
गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत.
राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर कैफने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कैफ म्हणाला की, ” अलाहाबाद या शहरात मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे या शहराची संस्कृती मला चांगलीच माहिती आहे. ही संस्कृती गंगा-जमुना यांची आहे. मला रामलीला पाहणे फार आवडते आणि मी त्याचा चाहता आहे. भगवान राम हे प्रत्येक माणसामधील चांगले गुण पाहायचे. त्यामुळे त्यांचे हे विचार आपण पुढे न्यायला हवेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जी लोकं द्वेष किंवा तेढ निर्माण करतात त्यांना प्रेम आणि एकताच्या मार्गावर येण्याची परवानगी देऊ नये.”
भारताचा क्रिकेटपटू सुरैश रैनानेही यावेळी राम मंदिराच्या भूमी पुजनाबद्दल भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या गोष्टीमुळे देशात शांती राहण्यास मदत होईल आणि संबंधही सुराधले जातील, असे म्हटले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I really like and appreciate your blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.