गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. पण हे सर्व सुरु असताना भारताची महिला कुस्तीपटू गीता फोगटने प्रभू रामचंद्र आणि नरेंद्र मोदी यांचा एकत्रित असा एक फोटो ट्विट केला. त्यानंतर या फोटोवरून चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत.

गीताने आज राम मंदिराबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने, जय, जय राम… ऐतिहासिक दिवस! असे म्हटले आहे. कोणीही असा संदेश लिहीणे चुकीचे नाही. पण या ट्विटबरोबर गीताने जो काही फोटो वापरला आहे. त्यामुळे चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गीताने ट्विट करताना एक फोटो वापरला आहे. या फोटोमध्ये राम मंदिर दिसत आहे. या राम मंदिराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्र यांना घेऊन जात असल्याचे दाखवले आहे. पण यावेळी प्रभू रामचंद्र यांचे लहान रुप दाखवले आहे आणि ते मोदी यांचा हात पकडून राम मंदिरात जात असल्याचे दाखवले गेले आहे. त्यामुळेच हा सर्व वाद सुरु झालेला पाहायला मिळत आहे.

या फोटोवरून आता बराच वाद सुरु झाला आहे. तुम्ही प्रभू रामचंद्र यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठे समजता का, असा सवाल विचारला जात आहे. काही लोकांनी तर हे चित्र अशोभनीय आहे आणि ते काढून टाकायला हवे, असेही म्हटले आहे. काही जणांनी तर ही रामभक्ती नसून मोदी भक्ती असल्याचे म्हटले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here