मुंबई: आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नईविरुद्ध सामन्यात मोठा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने आठ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या. मुंबईला कमी धावसंख्येत रोखण्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने महत्त्वाची भूमिका बजावली. चेन्नईच्या या वेगवान गोलंदाजाने रोहित शर्मा आणि टीम डेव्हिडसारखे मोठे विकेट मिळवले. मात्र सामना संपल्यानंतर त्याने विचित्र विधान करून क्रिकेट चाहत्यांमध्ये नवीनच वाद सुरू केला आहे. चौथ्या षटकात रोहित शर्माला क्लीन बोल्ड करणारा तुषार देशपांडे काय म्हणाला, पाहा. मुंबईकडून देशांतर्गत सामन्यात पदार्पण केल्यानंतर, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग असलेला तुषार देशपांडे म्हणतो, ‘रोहित शर्माची विकेट घेणे सोपे आहे, तो विराट कोहली किंवा एबी डिव्हिलियर्ससारखा नाही’. सामन्यानंतर देशपांडेच्या गोलंदाजीबद्दल विचारले असता धोनी म्हणाला, ‘आमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुमच्यावर दबाव असतो, पण आयपीएलमध्ये वेगळ्या प्रकारचे दडपण असते. त्याचा देशांतर्गत हंगाम चांगला होता, तो सुधारत आहे.’
तुषार देशपांडेच्या या विचित्र वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याने मुंबई इंडियन्स कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला चौथ्या षटकात क्लीन बोल्ड केले होते. चेन्नईच्या पहिल्याच सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येत तुषार देशपांडेमुले सामना गमावला असे अनेकांनी म्हटले होते. धोनीएनदेखील नो बॉल वाईड बॉल कमी टाकण्याची सक्त ताकीद दिली होती. आता त्याच्या या वक्तव्याने एक वेगळाच गोंधळ निर्माण झाला आहे.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला विश्वास आहे की पहिले दोन सामने गमावल्यानंतर त्याला आणि इतर सिनियर खेळाडूंना जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल. रोहित, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘आम्हाला आयपीएलची पद्धत माहित आहे. आम्हाला थोडी लय मिळणे आवश्यक आहे आणि जर तसे केले नाही तर ते संघासाठी कठीण होऊन बसेल.’
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Thank you very much for sharing such a useful article. Will definitely saved and revisit your site
Okbet Sportsbook Ph