गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. राम मंदिराचे भूमीपुजन झाल्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने देशवासियांना एक संदेश दिला आहे.

गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत.

राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर गंभीरने देशवासियांना एक संदेश दिला आहे. हा संदेश त्याने ट्विटच्या माध्यमातून दिला असून हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. गंभीरने नेमके ट्विटमध्ये म्हटले तरी काय, पाहा…

गंभीरने राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” कोणावरही दडपशाही न करणे आणि सर्वांच्या समस्यांचे निराकारण करणे, या दोन गोष्टींमुळे देशामध्ये एकात्मता टिकून राहत असते. प्राचीन काळापासून आपण प्रभू रामचंद्र यांचे विचार ऐकत आलो आहोत आणि त्यांच्या विचारांनी भारतीयांना आतापर्यंत उत्तम मार्गदर्शन केले आहे, दिशा दाखवली आहे. प्रभू रामचंद्र हे काही मुल्यांचे प्रतीक होते. त्यामध्ये न्याय आणि चांगुलपणा या गोष्टीही आहेत. भारतीयांनी ही मुल्ये आपल्यामध्ये रुजवण्यासाठी परीश्रम घ्यायला हवेत.”

राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. कैफ राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर नेमकं काय म्हणाला ते पाहा…

राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर भारतामध्ये संमिश्र वातावरण आहे. काही जणं या गोष्टीमुळे आनंदीत झालेले आहेत, तर काही जणांनी या करोनाच्या काळात ही गोष्ट करायला हवी होती का, हा प्रश्नही उपस्थित केला आहे. कैफ तर अलाहाबादमध्येच राहतो, त्यामुळे या सर्व गोष्टी त्याने जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घेऊया…

राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर कैफने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कैफ म्हणाला की, ” अलाहाबाद या शहरात मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे या शहराची संस्कृती मला चांगलीच माहिती आहे. ही संस्कृती गंगा-जमुना यांची आहे. मला रामलीला पाहणे फार आवडते आणि मी त्याचा चाहता आहे. भगवान राम हे प्रत्येक माणसामधील चांगले गुण पाहायचे. त्यामुळे त्यांचे हे विचार आपण पुढे न्यायला हवेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जी लोकं द्वेष किंवा तेढ निर्माण करतात त्यांना प्रेम आणि एकताच्या मार्गावर येण्याची परवानगी देऊ नये.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here