अहमदाबाद: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्समधील रविवारी झालेल्या सामन्याचे शेवटचे षटक परत परत पाहावे वाटेल असे होते. अफलातून फलंदाजी आणि सलग ५ चेंडूंवर ५ षटकार काय खेळी होती. प्रत्येकानेच रिंकू सिंगच्या या खेळीचे कौतुक केले. केकेआरचा कर्णधार नितीश राणाला तर त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. पण या सामन्यात रिंकू ज्या बॅटने खेळला ती बॅट त्याची नव्हतीच, नितीश राणा आणि रिंकूचा सामन्यानंतरचा एका व्हिडीओमध्ये ही माहिती मिळाली. शेवटच्या ५ चेंडूत कोलकाताला विजयासाठी २८ धावांची गरज असताना रिंकूने एकापाठोपाठ एक ५ षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गुजरातविरुद्ध रिंकूची बॅट चांगलीच तळपत होती. त्याने २१ चेंडूत ६ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने नाबाद ४८ धावा केल्या. पण आता प्रश्न असा पडतो की रिंकूने हा चमत्कार केला ती बॅट कोणाची होती? ५ षटकार मारणाऱ्या बॅटमागची खास कहाणी काय आहे? पाहूया

रिंकूने आपल्याच मित्राला धू धू धुतलं! कधीही विसरणार नाही ते ५ सिक्स, कोण आहे यश दयाल?
बॅट होती….

रिंकू सिंगने शेवटच्या षटकात ज्या बॅटने ५ षटकार मारले ती बॅट इतर कोणाची नसून कोलकाता संघाचा कर्णधार नितीश राणाची होती. सामना संपल्यानंतर खुद्द नितीशने हा खुलासा केला आहे. याचा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे.


त्या व्हिडिओमध्ये नितीश राणा सांगत आहेत की ही बॅट त्याची आहे. त्याने सांगितले की रिंकूने त्याच्याकडे ही बॅट मागितली होती. जी नितीशला द्यायची नव्हती. पण आतून कोणीतरी त्याच्यासाठी ही बॅट आणली. नितीशने या बॅटबद्दल सांगताना सांगितले की, ‘या बॅटने नितीशने शेवटचे २ सामने आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा संपूर्ण सीझन खेळलो आहे. बॅटबद्दल बोलताना नितीश म्हणाला की, या बॅटचा पिक अप खूप चांगला आहे आणि ती हलकीही आहे. पण आता ही बॅट माझी राहिली नाही, रिंकूची बॅट झाली आहे ही.”

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

रिंकू सिंगच्या या कारनाम्यासाठी आणि त्याच्या धाकड खेळीमागे त्याचा संघ आणि संघाचा कर्णधार नितीश राणाने त्याच्यावर संपूर्ण विश्वास दाखवला. या विश्वासच्या जोरावर रिंकू सिंगने आपली खेळी पुन्हा एकदा दाखवून दिला आणि गतविजेत्या तर सोबतच यंदाच्या आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव दाखवला.



Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here