बँगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामात दररोज रोमांच अधिक वाढवणारे सामने खेळवले जात आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत हा संघ जिंकणार की तो संघ या दुविधा मनःस्थितीत प्रेक्षक आणि चाहता वर्ग बसलेला असतो. असाच एक रोमांचक सामना सोमवारी रात्री एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पाहायला मिळाला, जिथे शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निर्णय मिळाला. २१२ धावा केल्यानंतर आरसीबीने गोलंदाजीतही चांगली सुरुवात केली. मात्र, आधी स्टॉयनिस आणि नंतर निकोलस पूरन यांच्या झंझावाती खेळीने सामना पूर्णपणे बदलून टाकला. अखेरच्या सामन्यात आयुष बडोनीच्या हिट विकेटने सामन्यात पुन्हा उत्साह आणला असला पण लखनऊने तरीही दणदणीत विजय मिळवला. चला तर पाहूया शेवटच्या षटकातील रोमांच….
२०व्या षटकाचा थरार
१९.१ – हर्षल पटेलच्या चेंडूवर उनाडकट एकेरी धाव .
आता ५ चेंडूत ४ धावांची आवश्यकता
१९.२ – मार्क वुडला हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले
१९.३ – रवी बिश्नोईची दुहेरी धाव.
१९.४ – रवी बिश्नोईची हर्षल पटेलच्या चेंडूवर एकेरी. धावसंख्या समान.
१९.५ – जयदेव उनाड झेलबाद.
१९.६ – शेवटच्या चेंडुवरील रोमांच काही औरच होता.
हर्षल पटेलने गोलंदाजीपूर्वी रवी बिश्नोईला नॉन स्ट्राइकवर धावबाद (मांकडींग) करण्याचा प्रयत्न केला पण तो चुकला. रनअप पूर्ण केल्यानंतर त्याने स्टंपला लक्ष्य केले पण नियमानुसार त्याला डेड बॉल देण्यात आला. हर्षलने पुन्हा गोलंदाजी केली आणि यावेळी आवेशला चेंडू मारता आला नाही. चेंडू यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे गेला पण तो पकडू शकला नाही. बिश्नोई आणि आवेश एकेरीसाठी धावले आणि कार्तिकचा थ्रो येण्यापूर्वीच त्यांनी धाव पूर्ण केली आणि सामना जिंकला.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
विजयानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिसचे कौतुक केले. राहुल म्हणाला, ‘अविश्वसनीय. चिन्नास्वामी स्टेडियम जिथे मी खेळून लहानाचा मोठा झालो आणि जिथे बहुतांश सामन्यांचा निर्णय शेवटच्या चेंडूवर होतो. आम्हाला माहित होते की एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नाही, त्यांनी पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली पण जर आम्ही सामना जिंकला तर ते पूरन आणि स्टॉयनिस यांच्यामुळे आहे. यामुळेच आम्ही पूरन, स्टोइनिस आणि आयुष बडोनी यांसारख्या तगड्या खेळाडूंना संघात घेतले आहे. बडोनी फिनिशरची भूमिका पार पाडायला शिकत आहे.’
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
You there, this is really good post here. Thanks for taking the time to post such valuable information.
sports betting in philippines