अनेकांनी खानचंद यांना आता तुमचा मुलगा स्टार क्रिकेटर बनला आहे. सिलेंडर डिलीव्हरी करण्याचं काम सोडून द्या. पण खानचंद यांनी हे काम न सोडण्याचं म्हटलं. याच रोजगाराने त्यांच्या कुटुंबाला सांभाळलं आहे, त्यामुळे हे काम सोडणार नसल्याचं ते म्हणाले.
रिंकू सिंहच्या कुटुंबियांचं आयुष्य आता बदलताना दिसत आहे. संपूर्ण शहरातून लोक त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. रिंकूचे वडील खानचंद यांनी सांगितलं, की माझ्या मुलाने आपल्या मेहनतीने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे आता सिलेंडरचा भार आता ओझं जाणवत नाही.
रिंकूच्या आई-वडिलांची एक इच्छा
रिंकू सिंहच्या आई-वडिलांची आता आणखी एक इच्छा आहे. लवकरात लवकर त्यांचा मुलगा आपल्या राष्ट्रीय टीममध्ये सामील व्हावा आणि देशासाठी क्रिकेट खेळावा अशी त्यांची इच्छा आहे.
२५ वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात अलीगढला शिफ्ट झालेलं कुटुंब
रिंकूचं कुटुंब मूळचं बुलंदशहरमधील दानपूर गावातील रहिवाशी आहेत. २५ वर्षांपूर्वी रिंकूचे वडील रोजगाराच्या शोधात अलीगढ शिफ्ट झाले होते. त्याचं आजही वडिलोपार्जित घर बुलंदशहरात आहे. रविवारी रिंकूने केलेल्या कामगिरीने संपूर्ण गावाला त्याचा अभिमान वाटतो आहे.
रिंकूला पाच भावंड आहेत. घरची परिस्थिती नसल्याने रिंकूवर पैसे कमावण्याची जबाबदारी लवकर आली. नववीत असताना तो नापास झाला होता आणि त्यानंतर त्याने कधीही पुढे अभ्यास केला नाही. केवळ क्रिकेटवर फोकस केला. यादरम्यान तो एका कोचिंग क्लासमध्ये लादी पुसण्याचं कामही करत होता.
स्वप्न होतं गायक होण्याचं पण परिस्थितीमुळे बनला गोळेवाला; तरुणानं हार मानली नाही, महिन्याला भरघोस कमाई
रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रिंकू सिंहच्या सलग पाच षटकारांमुळे कोलकाता नाइट रायडर्सने लखनऊ गुजरात टायटन्सचा तीन विकेटने पराभव केला. रिंकूने २१ चेंडूमध्ये नाबाद ४८ धावा केल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times