यावर्षीचे आयपीएल हे युएईमध्ये खेळवले जाणार आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि सर्व संघ मालकांनी कंबर कसली आहे. पण युएईमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यासाठी संघ मालक तयार नसल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी संघ मालकांनी आता नवीन आयडिया शोधून काढली आहे.

आयपीएल ही जवळपास दोन महिने चालणार आहे. पण खेळाडूंना आयपीएल सुरु असताना मात्र प्रत्येक पाच दिवसांनी करोना चाचणी करावी लागणार आहे. पाच दिवसांमध्ये एखादा संघ एक किंवा दोन सामने खेळणार आहे. या सामन्यांमध्ये जर खेळाडू करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला तर त्यालाही करोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे आयपीएल सुरु असतानाही खेळाडूंना प्रत्येक पाच दिवसांनी करोनाची चाचणी करावी लागणार आहे.

आयपीएल जर खेळायची असले तर प्रत्येक खेळाडूला करोना चाचणी करावी लागणार आहे. करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यावरच त्या खेळाडूला आयपीएल खेळण्यासाठी युएईला जायला मिळणार आहे. आयपीएल खेळायचे असेल तर प्रत्येक खेळाडूला करोना चाचणी करणे अनिवार्य आहे. करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यावरच त्या खेळाडूला आयपीएल खेळण्यासाठी युएईला जायला मिळणार आहे.

खेळाडूंसाठी संघ मालक पंचतारांकित हॉटेलपेक्षा काही रीसॉर्ट किंवा अपार्टमेंटला शोध घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ युएईमध्ये एका गोल्फ क्लबच्या रीसॉर्टवर खेळाडूंना ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या खेळाडूंसाठी एक मोठे अपार्टमेंट पाहत आहे. कोलकाता नाईट राडडर्सचा संघ आपल्या खेळाडूंना दुबईमध्ये नाही तर आबुधाबीमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहे. करोनाच्या काळात पंचतारांकित हॉटेलपेक्षा रीसॉर्ट हे जास्त सुरक्षित असतील, असे संघ मालकांना वाटत आहे. त्यामुळे आता ते वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.

यावर्षी आयपीएल संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे. आयपीएल जर यशस्वी करायची असेल तर युएईमधील करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन बीसीसीआय आणि आयपीएल खेळाडूंना करावे लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here