नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा आयपीएलमध्ये मागील अनेक काळापासून चांगला खेळ करू शकला नाही. मागील बराच काळ तो अर्धशतकही करू शकला नव्हता. पण मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात हिटमॅनने तुफानी खेळी केली. या सामन्यात रोहित त्याच्या विंटेज फॉर्ममध्ये दिसला. त्याने षटकार-चौकारांचा अक्षरश: पाऊस पाडला. रोहितने या सामन्यात त्याचं अर्धशतक केलं. त्याने एकूण ६५ धावा केल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डही देण्यात आला. हिटमॅनच्या खेळीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने आपला पहिला विजय मिळवला. हा सामना रोहित शर्मासाठी अतिशय खास ठरला. सामन्याच्या शेवटी रोहितने ही मॅच स्वत:साठी अधिकच खास ठरवली.

लखनऊ जायंट्सच्या निकोलसचं १५ चेंडूत अर्धशतक, पण मोडू शकला नाही लोकेश राहुलचा विक्रम

हिंमतीला दाद; बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पुढे घोडी पळवणारी १४ वर्षांची घोडेस्वार; गावकरीही थक्क

रोहित शर्माने मॅचनंतर त्याच्या पत्नीला रितिका सजदेहला व्हिडिओ कॉल केला. रोहित व्हिडिओ कॉलवर त्याच्या पत्नीशी बोलताना दिसला. याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे. रोहित या कॉलदरम्यान अतिशय आनंदी दिसत होता. रोहित आणि रितिकाचा व्हिडिओ कॉल सध्या चर्चेत आहे. रोहितचा हा विजय दोघांनी अशाप्रकारे सेलिब्रेट केला.
IPL 2023: कोणीही खरेदी करायला तयार नव्हतं, पण मुंबई इंडियन्सने विश्वास दाखवला; पियुष चावलाने संधीचं सोनं केलं
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने मुंबईसमोर १७३ धावांचं विशाल लक्ष्य उभं केलं, जे रोहितच्या पलटणने ४ विकेट गमावून शेवटच्या चेंडूवर साध्य केलं. रोहित शर्माने या सामन्यात ४५ चेंडूमध्ये पाच षटकार आणि सहा चौकार करत ६५ धावांची दमदार खेळी केली. शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने दिल्लीवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स असा १६ वा सामना खेळला गेला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचा थरारक सामना पाहायला मिळाला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपला पहिला विजय मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here