मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कोलकाताविरुद्ध खेळण्यापूर्वी भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलसोबत जाहिरात करत आहे. दरम्यान, रोहित शर्मा बॉलिवूड स्टार संजय दत्तच्या वास्तव लूकमध्ये दिसणार आहे. रोहितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि निळ्या रंगाचा वासकोट घातला आहे. याशिवाय चित्रपटातील संजय दत्तप्रमाणेच त्यानेही गळ्यात पन्नास तोळ्याची सोन्याची चैन आणि हातात सोन्याचं ब्रेसलेट घातलं आहे. त्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या जाहिरातीदरम्यानचे काही क्षण त्याने या व्हिडीओमध्ये दाखवले आहेत.
या जाहिरातीच्या शूटसाठी अहितची पत्नी रितिका सजदेहसुद्धा उपस्थित होती. विशेष म्हणजे या जाहिरातीदरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने खऱ्याखुऱ्या रघूचा लूक चांगलाच साकारला आहे. रोहित शर्मा आणि संजय दत्तच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. खऱ्या रघूच्या या लूकमध्ये रोहित खूपच छान दिसत आहे. रोहितच्या या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत तसेच व्ह्यूजही लाखोमध्ये आले आहेत.
शूटिंगदरम्यान रोहित मस्तीच्या मूडमध्ये आहे. त्याच वेळी, श्रेयस अय्यर ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि गिल रोहितचा पीए झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत रोहित शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘पचास तोला एंटरटेनमेंट’
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
दुसरीकडे, जर आपण क्रिकेटबद्दल बोललो तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने मेगा लीगच्या १६व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी राखून पराभव करून पहिला विजय नोंदवला. एमआय संघ आता आपला पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर १६ एप्रिलला दोन्ही संघ आमनेसामने येतील.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Hi just want say that this article is very nice and very informative article.I will make sure to be reading your blog more.
SDC Championship