IPL 2023 Updated Points Table : आयपीएलच्या 16व्या मोसमातील 21 व्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) च्या संघाने लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाचा 2 गडी राखून पराभव केला. पंजाबने या मोसमातील तिसरा विजय नोंदवला आणि आता गुणतालिकेत चौथे स्थान मिळवलं आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग दोन पराभव स्वीकारल्यानंतर पंजाब किंग्स लखनौ विरुद्ध विजयी मिळवून पुन्हा टी20 लीगमध्ये पुनरागमन केलं आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्स संघावर 23 धावांनी विजय मिळवला. हा दिल्लीचा सलग पाचवा पराभव होता. यानंतर आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे जाणून घ्या.
sports