नवी दिल्ली: जगभरात करोना संकट अद्याप कमी झाले नाही. अनेक देशात अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच एका क्रिकेटपटूची पॉझिटिव्ह आल्याचे चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या चर्चेवर खुद्द त्या खेळाडूने स्पष्टीकरण दिले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक ४०० धावांचा विक्रम करणारा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज याला करोनाची लागण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. लाराची करोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. यामुळे त्याचे चाहते काळजीत होते. आता सोशल मीडियावरील या चर्चेवर खुद्द लाराने उत्तर दिले आहे.

वाचा-
माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त चुकीचे असून त्यात कोणतेही तथ्य नाही. माझी टेस्ट नेगेटिव्ह असल्याचे, लाराने सांगितले. लाराने इस्टाग्रामवरील पोस्टमध्ये ही माहिती दिली. करोना काळात अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका असे आवाहन लाराने सर्वांना केले आहे.

वाचा-
सर्वांना नमस्कार, मी त्या सर्व अफवा वाचल्या आहेत ज्यात असे म्हटले गेले आहे की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण याबाबत मी सर्वांना स्पष्ट करू इच्छीतो. ही गोष्टी पूर्णपणे खोटी आहे. सध्या आपण सर्व जण करोनाशी लढत आहे. अशातच काही जण दहशत पसरवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात, असे लाराने पोस्टमध्ये म्हटले आहे.

मला स्वत:ला करोनाची लागण झाली नाही. पण अशा प्रकारच्या बातमीमुळे माझ्या आजूबाजूचे लोक अनावश्यक काळजी करू लागतात. मी प्रार्थना करतो की आपण सर्व जण सुरक्षित राहू. कारण करोना नजिकच्या भविष्यकाळात तरी जाणार नाही.

वाचा-
ब्रायन लाराने वेस्ट इंडिजकडून खेळताना १३१ कसोटी सामन्यात ५२.९च्या सरासरीने ३४ शतकांसह ११ हजार ९५३ धावा केल्या आहेत. तर २९९ वनडेत ४०.५ च्या सरासरीने १९ शतकांसह १० हजार ४०५ धावा केल्यात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here