दुसऱ्या बाजूला राजस्थान विरुद्ध झालेल्या लढतीत चेन्नईचा निसटता पराभव झाला. डेवॉन कॉन्वेने अर्धशतकी खेळी केली होती. तर जडेजा आणि धोनीने अखेरच्या षटकात जोरदार फटकेबाजी केली, मात्र चेन्नईला विजय मिळवता आले नाही.
असे आहे पिच
चिन्नास्वामी मैदानावर नेहमीच धावांचा पाऊस पडतो. बेंगळुरूच्या या मैदानावर मोठी धावसंख्या देखील सुरक्षित मानली जात नाही. सिमारेषा जवळ असल्याने चौकार, षटकार जास्त पहायला मिळतात. याच मैदानावर बेंगळुरूविरुद्ध लखनौने २१३ धावांचे लक्ष्य पार केले होते.
या मैदानावर झालेल्या १०१ सामन्यात ५४ वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. तर ४५ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६५ इतकी आहे.
बेंगळुरू वि. चेन्नई
वेळ : संध्याकाळी ७.३० पासून
स्थळ : एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा अॅप
आमनेसामने : एकूण सामने ३१. चेन्नईचे २१ विजय. बेंगळुरूचे १० विजय
नाणेफेकीचे समीकरण : नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा भर आव्हानाचा पाठलाग करण्यावर असेल
खेळपट्टीचा अंदाज : चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात असते. त्यामुळे धावांची बरसात होणार. येथे कितीही धावसंख्येचे लक्ष्य सुरक्षित ठरत नाही, त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा संघ दोनशे प्लस धावांचे आव्हान उभारण्यावर भर देईल
हवामानाचा अंदाज : तापमान २६ ते ३१ अंशादरम्यान असेल
> विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ९ अर्धशतके केली आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज
चेन्नईची बाजू
-चेन्नईने दोन लढती जिंकल्या असून दोन लढती गमावल्या आहेत
-गेल्या लढतीत चेन्नईला राजस्थानविरुद्ध थोडक्यात हार मानावी लागली होती
-डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे हे आघाडीचे फलंदाज फॉर्मात
-मधल्या फळीत शिवम दुबे, अम्बटी रायुडू यांना अपेक्षित कामगिरी जमलेली नाही
-पाहुण्या चेन्नईसाठी वेगवान गोलंदाजी चिंतेची बाब ठरते आहे
-वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे विकेट टिपतो, पण धावांच्याबाबतीत तो महागात पडतो
-वेगवान गोलंदाज महीश थिकशाना आणि आकाशसिंग हेदेखील धावांची खैरात वाटताना दिसतात
-वेगवान गोलंदाज अपयशी ठरत असल्याने रवींद्र जाडेजा, मोईन अली या फिरकी गोलंदाजांवरील दडपण वाढते
बेंगळुरूची बाजू
-बेंगळुरूने दोन लढती जिंकल्या असून दोन सामने गमावले आहेत
-सलग दोन पराभवांनंतर बेंगळुरूची दिल्ली कॅपिटल्सवर मात
-विराटने यंदा आत्तापर्यंतच्या चार लढतींत तीन अर्धशतके केली आहेत
-दिल्लीविरुद्ध विराटसह, फॉर्मात असलेला डुप्लेसिस, महिपाल लोमरूर आणि ग्लेन मॅक्सवेल यांची बॅटही तळपली
-गेल्या लढतीतील यश आणि फलंदाजांची कामगिरी यामुळे बेंगळुरूकडे चेन्नईलाही नमविण्याचा विश्वास
-मधल्या फळीतील दिनेश कार्तिकला अपयश. चारपैकी दोन डावांत त्याला भोपळाही फोडता आला नाही
-दरम्यान वाणिंदू हसरंगाच्या समावेशामुळे बेंगळुरूची ताकद आणखी वाढली
-दिल्लीविरुद्धच्या गेल्या लढतीत बेंगळुरूकडून विजयकुमारने स्वप्नवत पदार्पण करत अवघ्या २० धावांत ३ विकेट टिपल्या
-हसरंगा आणि विजयकुमार ही जोडी पुढील सामन्यांत महत्त्वाची भूमिका बजावू शकते
-सिराज, हर्षल पटेल आणि वेन पार्नेल हे वेगवान गोलंदाजीचे त्रिकूट नेटाने मारा करत आहे
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times