केकेआरचा फिरकीपटू सुयश शर्माने रोहितला बाद केले. पण या छोट्या खेळीत हिटमॅनने मोठी कामगिरी केली. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध १ हजार ४० धावा केल्या आहेत. याबाबत त्याने शिखर धवनला मागे टाकले.
शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १ हजार २९ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याने कोलकाताविरुद्ध १ हजार १८ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने चेन्नई विरुद्ध ९७९ धावा केल्या आहेत.
वानखेडे मैदानावर काल झालेल्या लढतीत केकेआरने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १८६ धावा केल्या होत्या. मुंबईने विजयाचे लक्ष्य १७.४ चेंडूत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. रोहितच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमारने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. तर सलामीवीर ईशान किशनने २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. या शिवाय तिलक वर्माने ३० आणि टिम डेव्हिडने नाबाद २४ धावांचे योगदान दिले.
राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times