आता आयपीएल तोंडवर आल्यावर विवोने आपण या वर्षी तरी आयपीएलला प्रायोजकत्व देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधी प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे. यावेळी बीसीसीआयने काही पर्यायांवर विचार सुरु केला असल्याचे समजते आहे. यापूर्वी प्रायोजकत्व घेतलेल्या आणि यापूर्वी त्यासाठी उत्सुक असलेल्या कंपन्यांबरोबर बीसीसीआय बोलणी करत असल्याचे म्हटले जात आहे.पण कोणती कंपनी यासाठी तयार होणार, हे मात्र कोडे सुटलेले नाही.

आयपीएलच्या प्रायोजत्वासाठी बीसीसीआयची रिलायन्सच्या जिओ या कंपनीबरोबर बोलणी सुरु असल्याचे ऐकिवात आहे. आयपीएलला जर कोणीही प्रायजोकत्व एवढ्या लवकर देत नसेल तर रिलायन्सची जिओ ही कंपनी पुढे येऊ शकते, असेही म्हटले जात आहे. कारण जिओने आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना आयपीएलच्या प्रायोजकत्वाचा फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. रिलायन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. त्याचबरोबर मुकेश यांची पत्नी नीता यांचा मालकीचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे परस्पर हितसंबंध यामुळे जपले जाणार की नाही, हे तपासून पाहावे लागणार आहे.

जिओबरोबर ‘बायजू’ या लर्निंग अॅपच्या कंपनीबरोबरही बीसीसीआय चर्चा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बायजू’ कंपनीचा लोगो तुम्ही बऱ्याचदा भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर पाहिली आहे. ‘बायजू’ ही कंपनी भारतीय संघाची जर्सी पार्टनर आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स या संघाबरोबरही ‘बायजू’ कंपनीचा करार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान हा ‘बायजू’ कंपनीच्या जाहिरातीमध्येही पाहायला मिळतो. पण ‘बायजू’ कंपनी आता आयपीएलचे प्रायोजकत्व घेणार का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.

आयपीएलला या वर्षी प्रायोजकत्व देण्यासाठी पेप्सिको ही कंपनी पुढे येऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण यापूर्वी आयपीएलचे प्रायोजकत्व या कंपनीकडे होते. ही कंपनी दरवर्षी आयपीएलला ३९६ कोटी रुपये देत होती. विवोने ही रक्कम ४४० कोटी रुपयांपर्यंत नेल्यावर पेप्सिकोचे प्रायोजकत्व संपुष्टात आले होते. या वर्षी आयपीएल सर्वात जास्त हिट होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे पेप्सिको ही कंपनी या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी आयपीएलला पुन्हा एकदा प्रायोजकत्व देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

आयपीएलची यावेळी कोकाकोला या कंपनीबरोबर प्रायोजकत्व देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. कोकाकोला कंपनीने आयपीएलला प्रायोजकत्व देण्यासाठी यापूर्वी उत्सुकता दाखवली होती, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय आता कोकाकोला या कंपनीबरोबर आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी चर्चा करत असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.कारण जर कोकाकोलाबरोबर बीसीसीआयने करार केला तर त्यांना पेप्सिकोपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय कोकाकोला या कंपनीबरोबर करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here