नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेला आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे. करोना संकटानंतर क्रिकेट विश्वात होणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या स्पर्धेवर आहे. या स्पर्धेत भारतासह परदेशातील खेळाडू खेळणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेबाबत सर्वांना उत्सुकत आहे.

आयपीएलच्या १३व्या हंगामातील सर्वात मोठे आकर्षण असणार आहे ते भारताचा माजी कर्णधार याची कामगिरी होय. धोनी एका वर्षानंतर पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. त्याला मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर त्याच्या कामगिरीवर भारतीय निवड समितीसह संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. धोनीने जर चांगली कामगिरी केली तर भारतीय संघात त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळू शकते.

वाचा-
आयपीएलमध्ये धोनीची कामगिरी वेगळ्या उंचीवर पोहोचते. संघाला धोनीने ३ वेळा विजेतेपद मिळून दिले आहे. धोनीचे आणि चेन्नईचे कनेक्शन सर्वांना माहित आहे. क्रिकेटमधील IPL या महाकुंभ मेळ्याला भारत सरकारने हिरवा कंदील दिला आहे. आता बातमीचा परिणाम शेअर बाजारात दिसू लागलाय.

आयपीएलमधील सर्वात फेव्हरेट संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे शेअरच्या किमतीत मोठी तेजी आली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेचे शेअर गेल्या ५ दिवसात ५० टक्क्यांहून अधिकने वाढले आहेत. सीएसकेच्या शेअरची किमत ३५-३७ रुपयांवरून ५२ ते ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ७ जुलै रोजी धोनीच्या वाढदिवसा असलेल्या किमती आज दुप्पट झाल्या आहेत.

वाचा-
नोव्हेंबर २०१८ मध्ये इटी मार्केट्सनुसार सीएसकेचे शेअर १३ ते १५ रुपयांवर होते. तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप ४५० कोटी होते. गेल्या २० महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ४०० टक्क्यांची वाढ झाली आहे.

अर्थात यावर्षी आयपीएलचे प्रायोजक असलेल्या व्हिवोने प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यामुळे बीसीसीआयला मोठा झटका बसला आहे. आता बोर्डाकडून नवा प्रायोजक शोधण्याचे काम सुरू सुरू आहे. व्हिवोने पाच वर्षासाठी २ हजार १९९ कोटी रुपये मोजले होते. ते प्रत्येक वर्षी बोर्डाला ४४० कोटी रुपये देत होते.

वाचा-

अनेक नकारात्मक बातम्या असताना देखील सीएसकेच्या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा शेअर पोर्टफोलियोमध्ये असावा असे संदीप गिनोडिया यांनी सांगितले. २०१९-२० साली सीएसकेचा नफा ५४.७ टक्क्यांनी घसरून तो ५०.३३ कोटी झाला होता. गेल्या वर्षीचा नफा १११.२ कोटी होता. कंपनीचा महसूल १४.७ टक्क्यांनी घसरून ४१७.४३ कोटींवरून ३५६.५३ कोटींवर आला होता.

सीएसकेमध्ये राधाकिशन दमानी यांचा २.९४ टक्के हिस्सा, तर LICचा ६.०४ टक्के इतका हिस्सा आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here