बेंगळुरूची फलंदाजी सुरू असताना चेन्नईकडून ८वे षटक रविंद्र जडेजाने टाकले. या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेलने दमदार शॉट खेळण्यास सुरुवात केली. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारण्यासाठी मोठा शॉट खेळला. चेंडू उंच सीमारेषे बाहेर जात होता. पण ३४ वर्षीय अजिंक्यने हवेत उडी मारली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊ दिला नाही. अजिंक्यमुळे चेन्नईने ४ धावा वाचवल्या. अजिंक्यने अखेरपर्यंत चेंडूवरून नजर हटवली नाही आणि अगदी अचूक क्षणी हवेत उडी मारून षटकार रोखला. अजिंक्यने वाचवलेल्या या ४ धावा चेन्नईला विजयासाठी उपयोगी ठरल्या, कारण सीएसकेने ही लढत फक्त ८ धावांनी जिंकली.
अजिंक्यने फक्त फिल्डिंगमध्ये नाही तर फलंदाजीत कमाल दाखवली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अजिंक्यने २० चेंडूत ३७ धावा केल्या, यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. याआधी त्याने १५ चेंडूत अर्धशतकी खेळी करत मुंबई इंडियन्सचा समाचार घेतला होता.
सामन्यात चेन्नईकडून कॉन्वेने ४५ चेंडूत ८३ धावा केल्या, यात ६ चौकार आणि षटकारांचा समावेश होता. तर शिवम दुबेने २७ चेंडूत वादली ५२ धावांची खेळी केली. आरसीबीकडून कर्णधार डु प्लेसिसने ३३ चेंडूत ६२ तर मॅक्सवेलने ३६ चेंडूत ७६ धावा केल्या. पण ही जोडी बाद झाल्यानंतर बेंगळुरूला फिनिशर भेटला नाही.
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More