आयपीएलचे निवेदन
आयपीएलने विराट कोहलीवरील दंडाबाबत आपल्या वेबसाइटवर एक निवेदन जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की कोहलीने सोमवारी सीएसकेविरुद्ध आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. यासाठी त्याला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १चा गुन्हा मान्य केला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल १ प्रमाणे सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. मात्र, निवेदनात कोणत्याही घटनेचा उल्लेख नाही.
विराट स्वस्तात बाद
चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर २३१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली सलामीला आला आणि पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्याचवेळी गोलंदाज आकाश सिंहच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने शानदार चौकार लगावला. षटकातील तिसरा चेंडू चुकल्यानंतर तो पुन्हा एकदा चौकार मारण्यासाठी बाजूला गेला. पण चेंडू त्याच्या पॅडला लागून स्टंपला लागला. त्यामुळे त्याचा डाव केवळ ८ धावांवर संपला. या बोल्ड आऊटनंतर विराट कोहलीने एक नकोस विक्रमही आपल्या नावे केला आहे. तो आयपीएलमध्ये ३८व्यांदा बोल्ड झाला आहे.
नकोसा विक्रम
विराट कोहली CSK विरुद्ध बाद झाला आणि त्याच्या आयपीएल क्रिकेट कारकिर्दीत ३८व्यांदा बोल्ड झाला आहे. आता या लीगमध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली शिखर धवनसोबत पहिला आला आहे. या लीगमध्ये सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या बाबतीत शेन वॉटसन दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याच्यासोबत असे ३५ वेळा झाले आहे.
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
चेन्नई विरुद्ध बंगळुरू
चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळताना चेन्नईने १६ धावांवर रुतुराज गायकवाडच्या रूपात पहिली विकेट गमावली. यानंतर कॉनवे, दुबे आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. कॉनवेने ८३ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात आरसीबीने पॉवरप्लेनंतर २ गडी गमावून ७५ धावा केल्या. यानंतर डु प्लेसिस (६२) आणि मॅक्सवेल (७६) यांनी झटपट अर्धशतके झळकावली, पण आरसीबीला विजय मिळवून देता आला नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More