नवी दिल्ली : क्रिकेटचा देव असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकाने अर्जुन तेंडुलकरने नुकताच आयपीएल डेब्यू केला. त्याच्या डेब्यूनंतर अर्जुन तेंडुलकर सतत चर्चेत आहे. सचिन आणि अर्जुन ही अशी पहिली बाप-लेकाची जोडी आहे, ज्यांनी आयपीएल सामना खेळला. अर्जुननेही त्याच्या डेब्यू सामन्यात चांगली कामगिरी केली.

अर्जुनने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आपली पहिली आयपीएल विकेटदेखील घेतली. इतकंच नाही, तर अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणारा माजी वेस्टइंडिज खेळाडू इयान बिशपने सचिनबाबत अतिशय भावनिक गोष्ट शेअर केली आहे. बिशपने सांगितलं, की अर्जुनला आयपीएलमध्ये खेळताना पाहताना सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

अर्जुन तेंडुलकर खरंच कॅमेरामनला तसं काही बोलला का? हैदराबादविरुद्धच्या मॅच दरम्यानचा व्हिडिओ
आयपीएलमध्ये मागील अनेक वर्षांपासून कॉमेंट्री करणारा खेळाडू इयान बिशपने सचिन तेंडुलकरबाबत मोठा खुलासा केला. त्याने सांगितलं, अर्जुनचा आयपीएल डेब्यू पाहताना सचिनच्या डोळ्यात अश्रू होते. बिशपने हैदराबाद आणि मुंबईच्या मॅचमध्ये कॉमेंट्री करताना सांगितलं, की फ्लोअर मॅनेजरचं सचिनशी बोलणं झालं होतं.

अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण आणि बाप लेकाचा अजब योगायोग

अर्जुन आयपीएल खेळत असल्याचा सचिनला अतिशय आनंद आहे. त्यावेळी सचिनच्या डोळ्यात अश्रू होते. सचिनने फ्लोअर मॅनेजरशी बोलताना सांगितलं, की ज्यावेळी मी पहिल्यांदा आयपीएलमध्ये गोलंदाजी केली होती, त्यावेळी मी पहिल्या ओवरमध्ये पाच धावा दिल्या होत्या. आज अर्जुननेही पहिल्या ओवरमध्ये पाच धावा दिल्या.

पहिल्या विकेटनंतर अर्जुनने सांगितलं सचिनच्या गुरुमंत्राचे रहस्य, पाहा काय दिल्या होत्या टिप्स…
अर्जुनची प्रत्येक ओवर लक्षात राहील

भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू आणि मुख्य कोच असलेले रवि शास्त्री यांनी कॉमेंट्री करताना सचिन आणि अर्जुनबाबत खास बाब सांगितली. रवि शास्त्रींनी सांगितलं, अर्जुनला मिळालेल्या प्रत्येक चेंडूवेळी सचिन टेन्शन असेल. सचिन तो खेळलेले डाव विसरेल, पण तो अर्जुनने टाकलेली ओवर विसरणार नाही. अर्जुनची प्रत्येक ओवर त्याच्या लक्षात राहील.

दरम्यान, अर्जुनने शेवटची ओवर टाकली आणि त्याने एक विकेटही घेतली. मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर अर्जुनची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्याने शेवटची ओवर टाकताना चेंडूची दिशा आणि टप्पा यावर लक्ष दिल्याचं म्हटलं.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here