यावर्षी युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी चीनच्या विवो या कंपनीने स्पॉन्सरशिप काढून घेतली आहे. आयपीएल तोंडावर आलेली असताना चीनच्या कंपनीने बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे. पण आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स जिओ यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. पण यावेळी आयपीएललाल स्पॉन्सरशिप देण्यासाठी जिओपुढे एक मोठी समस्या असल्याचे आता पुढे आली आहे.

आता आयपीएल तोंडवर आल्यावर विवोने आपण या वर्षी तरी आयपीएलला प्रायोजकत्व देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधी प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे. पण यावेळी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची जिओ ही कंपनी पुढे आल्याचे समजते आहे. पण जिओने जर आयपीएलची स्पॉन्सरशिप घेण्याची ठरवली तर त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहीला आहे, असे काही जणांचे म्हणणे आहे.

जिओने आपल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना आयपीएलच्या प्रायोजकत्वाचा फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. रिलायन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या काळात एक घोषणा केली होती. या घोषणेमुळे जिओ या कंपनीला आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळू शकते, असे म्हटले जात आहे. करोनाच्या काळात मोदी यांनी आत्मनिर्भर भारत, ही घोषणा केली होती. रिलायन्सची जिओ ही कंपनी भारताचीच आहे. त्यामुळे आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी जिओचे काम सोपे होऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

मोदी यांच्यामुळे जिओचे काम सोपे होऊ शकते. पण बीसीसीआच्या काही नियमांमध्ये जिओ ही कंपनी अडकू शकते, असे म्हटले जात आहे. रिलायन्स जिओ ही कंपनी मुकेश अंबानी यांची आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता यांचा मालकीचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे परस्पर हितसंबंध यामुळे जपले जाणार की नाही, हे तपासून पाहावे लागणार आहे. जर परस्पर हितसंबंध जपले जात असतील तर जिओला आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवता येऊ शकणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here