जयपूर:आयपीएलचा हंगाम सुरू झाला आणि वाद झाला नाही असे कधीच घडत नाही. २०२३च्या हंगामात आतापर्यंत पार मोठा असा वाद घडला नाही. पण एका समालोचकाने भारतीय खेळाडूबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज केएल राहुलच्या स्ट्राइक रेटवरून नेहमी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात. टी-२० मध्ये देखील राहुल धीमी सुरुवात करतो आणि नंतर वेगाने धावा करून स्ट्राइक रेट मॅनेज करतो. आयपीएलच्या १६व्या हंगामात देखील राहुल असं करत आहे. ६ सामन्यात त्याने १९४ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट फक्त ११४.७९ इतका आहे.काल मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा राजस्थानच्या ट्रेंट बोल्टच्या पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने ६ चेंडूत एकही धाव काढली नाही. इतक नाही तर पॉवर प्लेमध्ये लखनौचा स्कोअर ३७ इतका होता. तेव्हा राहुलने १९ चेंडूत १९ धावा केल्या होत्या.
राहुल फलंदाजी करताना समालोचन इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसन करत होता. त्याला राहुलची ही संथ फलंदाजी आवडली नाही. त्यामुळेच तो लाइव्ह सामन्यात म्हणाला, केएल राहुलला पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करताना पाहणे हे आतापर्यंतचे सर्वात कंटाळवाने काम आहे.
राहुल फलंदाजी करताना समालोचन इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसन करत होता. त्याला राहुलची ही संथ फलंदाजी आवडली नाही. त्यामुळेच तो लाइव्ह सामन्यात म्हणाला, केएल राहुलला पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करताना पाहणे हे आतापर्यंतचे सर्वात कंटाळवाने काम आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध राहुलने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याला जेसन होल्डरने बाद केले. या खेळीत राहुलने १ षटकार आणि ४ चौकार मारले. विशेष म्हणजे राहुलला दोन वेळा जीवनदान देखील मिळाले होते. या हंगामात आरसीबीविरुद्ध जेव्हा लखनौने २१३ धावा केल्या होत्या, तेव्हा देखील राहुलने २० चेंडूत फक्त १८ धावाांची खेळी केली होती.
खराब स्ट्राइक रेटमुळे राहुलवर टीका होण्याची ही पहिली वेळ नाही. आयपीएल २०१९ पासून एकाही हंगामात त्याने १४० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या नाहीत. २०२०च्या हंगामात देखील राहुलच्या संथ खेळीवरून अनेकांनी टीका केली होती.
क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More