दक्षिण आफ्रिकेचा अनकॅप्ड प्लेअर डेवाल्ड ब्रेविस हा फक्त २० वर्षाचा आहे. आयपीएल २०२३च्या लिलावाआधी मुंबई संघाने ज्या १३ खेळाडूंना रिलीज केले होते त्यात ब्रेविसचे नाव नव्हते. मुंबई सोबतचा हा त्याचा दुसरा हंगाम आहे. अशाच जो खेळाडू मुंबई संघाचे भविष्य असल्याचे मानले जात आहे त्याला अखेर पाच पैकी एकाही सामन्यात का संधी दिली गेली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय.
कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये कॅमरुन ग्रीन, टिम डेव्हिड सारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. तर जलद गोलंदाजांमध्ये जेसन बेहरनडोर्फ आणि रिले मेरेडिथ यांना खेळवले आहे. SA20 मध्ये MI केपटाउनकडून ब्रेविसने सर्वाधिक धावा केल्या आहेत. १० डावात त्याने २६.११च्या सरासरीने आणि ११७.५०च्या स्ट्राइक रेटने २३५ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
ज्युनिअर एबीडी नावाने लोकप्रिय असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या CSA टी-२० चॅलेंजर्स मध्ये फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले होते. या डावात त्याने फक्त ५७ चेंडूत १६२ धावा केल्या होत्या. ब्रेविसची ओळक १९ वर्षाखालील वर्ल्डकपपासून आहे. त्याच्या धमाकेदार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने त्याचा संघात समावेश करून घेतला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More