आयपीएल सुरु असताना काही दिवसच शिल्लक असताना चीनच्या विवो या कंपनीने प्रायोजकत्व काढून घेतले आहे. त्यामुळे बीसीसीआयपुढे मोठा पेच निर्माण झाले होता. पण आता हा पेच सुटताना दिसत आहे. कारण बीसीसीआयला आता प्रायोजक मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे. पण त्यासाठी बीसीसीआयला बऱ्याच कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. बीसीसीआयने किती मोठे नुकसान होणार आहे, ते पाहा…

चीनच्या विवो या कंपनीने आयपीएलबरोबर पाच वर्षांचा करार केला होता. या करारानुसार विवो कंपनी आयपीएलसाठी ४४० कोटी रुपये देणार होती. पण आता विवो कंपनीने करार मोडला आहे. त्यामुळे बीसीसीआयला काहीही करून आयपीएलसाठी प्रायोजकत्व मिळवायचे आहे. त्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे.

आयपीएल सुरु व्हायला फार कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे काही करून लवकर बीसीसीआयल आयपीएलसाठी प्रायोजकत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एक कंपनी एवढ्या कमी कालावधीमध्ये आयपीएलला प्रायोजकत्व द्यायला तयार झाली असल्याचे समजते आहे. काही दिवस बीसीसीआय या कंपनीबरोबर प्रायोजकत्वासाठी चर्चा करत होती. या चर्चेला यश आले आहे. आयपीएलला प्रायोजकत्व द्यायला ही कंपनी तयार झाल्याचे समजत आहे. पण यासाठी या कंपनीने विवोपेक्षा कमी रक्कम सांगितली आहे. त्यामुळे आयपीएलला मोठा फटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे.

कोणत्या कंपनीबरोबर बीसीसीआयची चर्चा सुरु, पाहा…आयपीएलसाठी बीसीसीआय काही कंपन्यांबरोबर चर्चा करत आहे. पण एक कंपनी जी बीसीसीआयबरोबर यापूर्वीपासून कार्यरत आहे, ती कंपनी म्हणजे ‘बायजू’. कमी कालावधीमध्ये ‘बायजू’ ही कंपनी आयपीएलला प्रायोजकत्व द्यायला तयार असल्याचे समजत आहे. पण ‘बायजू’ कंपनीने आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी विवो कंपनीपेक्षा फार कमी रक्कम सांगितल्याचे समजते आहे.

किती आहे रक्कम‘बायजू’ या कंपनीने आयपीएलच्या यावर्षीच्या प्रायोजकत्वसाठी ३०० कोटी रुपये देण्याचे ठरवले असल्याचे समजते आहे. जर हा करार बीसीसीआयने आयपीएलसाठी केला तर त्यांना तब्बल १४० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ‘बायजू’ कंपनीबरोबर करार करायचा की अजून दुसरी जास्त रक्कम देणारी कंपनी शोधायची, याचा निर्णय आता बीसीसीआय घ्यावा लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here