नवी दिल्ली:आयपीएलच्या १६व्या हंगामात बुधवारी लखनौ सुपर जायंटस आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात चुरशीची लढत झाली. १५५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात धमाकेदार झाली होती. पण अखेरच्या क्षणी बाजी पलटली. लखनौने मॅच १० धावांनी जिंकली. आयपीएल २०२३ मध्ये अखेरच्या षटकापर्यंत किंवा अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेली ही एकमेव मॅच नव्हे. याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढत अशीच झाली होती. तेव्हा चेन्नईला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज होती पण धोनीला शेवटच्या चेंडूवर षटकार किंवा चौकार मारता आला नाही.आयपीएलमध्ये लढती चुरशीचा होत आहेत. पण चाहत्यांना एका गोष्टीची फार प्रतिक्षा करावी लागत आहे. गेल्या १४० सामन्यांपासून लीगमध्ये एकही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली नाही. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ च्या हंगामात एकही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली नव्हती. चाहत्यांनी आयपीएलमध्ये अखेरची सुपर ओव्र २०२१च्या हंगामात पाहिली होती. तेव्हा हंगामातील २०व्या लढतीत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात सुपर ओव्हर झाली होती आणि दिल्लीने विजय मिळवला होता. ही लढत २५ एप्रिल २०२१ रोजी झाली होती.

IPL सामन्यात भारतीय फलंदाजाची इज्जत काढली; इंग्लंडचा माजी प्लेअर म्हणाला, कधी सुधारणार…
२०२१ मध्ये झालेल्या सुपर ओव्हरनंतर आतापर्यंत १४२ मॅच झाल्या आहेत, पण सुपर ओव्हर काही झाली नाही. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत १४ वेळा सुपर ओव्हर झाली आहे. सर्वात पहिली सुपर ओव्र २००९ च्या हंगामात झाली. तेव्हा राजस्थान रॉयल्सने कोलकाताचा पराभव केला होता.

फलंदाजाने षटकारच मारला होता, पण फिल्डरला मान्य नव्हते; एका कॅचने जिंकणारी मॅच गमावली, Video
डबल सुपर ओव्हर

आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच डबल सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळाला आहे. २०२०च्या हंगामात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन सामन्यात डबल सुपर ओव्हर झाली होती. तेव्हा दोन्ही संघांनी १७६ धावा केल्या होत्या. पहिल्या सुपर ओव्हरनंतर मॅच टाय झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली.

RR vs LSG: टी-२० मध्ये फार कमी वेळा होतं असं; IPLच्या २५व्या लढतीत झाला विक्रम
कोणत्या संघाने किती सुपर ओव्हर

पंजाब किंग्ज- ४ सुपर ओव्हर, ३ जिंकल्या
दिल्ली कॅपिटल्स-४ सुपर ओव्हर, ३ जिंकल्या
मुंबई इंडियन्स- ४ सुपर ओव्हर, २ जिंकल्या
कोलकाता नाईट रायडर्स-४ सुपर ओव्हर, १ जिंकली
राजस्थान रॉयल्स- ३ सुपर ओव्हर, २ जिंकल्या
सनरायझर्स हैदराबाद- ४ सुपर ओव्हर, १ जिंकली
बेंगळुरू- ३ सुपर ओव्हर, १ जिंकली
चेन्नई सुपर किंग्ज-१ सुपर ओव्हर, १ जिंकली

कोणत्या हंगामात किती सुपर ओव्हर

आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली. या पहिल्या हंगामात एकही सुपर ओव्हर झाली नाही. तर दुसऱ्या हंगामात पहिली सुपर ओव्हर पहायला मिळाली. २०२० मध्ये सर्वाधिक ४ वेळा सुपर ओव्हर झाल्या होत्या.

२००९- ०१
२०१०-०१
२०१३-०२
२०१४- ०१
२०१५-०१
२०१७-०१
२०१९-०२
२०२०- ०४
२०२१- ०१

क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड


Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here