म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई‘दिलीप वेंगसरकर यांचे क्रिकेटमधील योगदान हे सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षाही कितीतरी मोठे आहे’, असे मत भारताचे माजी अष्टपैलू करसन घावरी यांनी व्यक्त केले. ओव्हल मैदान, चर्चगेट येथे ड्रीम ११ चषक या ११ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी घावरी यांनी हजेरी लावली होती. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर वेंगसरकर यांनी ज्या पद्धतीने तीन अकादमी निर्माण करून होतकरू खेळाडूंसाठी एक व्यासपीठ तयार करून उदयोन्मुख खेळाडूंच्या गुणवत्तेला खतपाणी घालण्याचे कार्य करीत आहेत ते नक्कीच अनुकरणीय आहे’, असे घावरी म्हणाले.
दरम्यान शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत एम. आय. जी. संघाने गणेश पालकर क्रिकेट क्लब संघावर सात धावांनी सनसनाटी विजय मिळवत ड्रीम ११ चषक जिंकला. स्पर्धेत अष्टपैलू खेळाची छाप पाडणारा वेदांग मिश्रा एम. आय. जीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. वेदांगला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस लाभले.

पारितोषिकासह स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांसह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी कसोटीवीर करसन घावरी, नाईक फिशरीसचे निस्सार नाईक, दीपक जाधव आणि ड्रीम ११ चे प्रशांत तायडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
स्कोअरबोर्ड : एम. आय. जी २० षटकांत २ बाद १४४ (अगस्त्य काशीकर नाबाद ५९, वेदांग मिश्रा ४७, प्रेरित राऊत नाबाद २८) विजयी वि. गणेश पालकर क्रिकेट क्लब २० षटकांत ९ बाद १३७ (सन्मित कोठमीरे ३५, सिद्धांत सिंग ४५; राजवीर लाड २४ धावांत ३ बळी).
क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More