मुंबई:भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येत्या २४ एप्रिल रोजी त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करणार आहे. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनचा हा वाढदिवस खास करण्याची एकही कसर त्याचे चाहते सोडणार नाहीत. या स्पेशल वाढदिवसाच्या आधी सचिनने एक खास केक कापला.
सचिनच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेल्या डेजर्ट स्टॉर्मला आज २५ वर्ष पूर्ण झाली. आजच्या दिवशी म्हणजे २२ एप्रिल १९९८ रोजी सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध युएईमध्ये विस्फोटक अशी फलंदाजी केली होती. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात सचिनने १३१ चेंडूत १४३ धावा कुटल्या होत्या. त्याच्या करिअरमधील टॉपच्या खेळीमध्ये या शतकाचा समावेश होते. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात सचिनने या खेळीची आठवण सांगितली.

पराभूत संघातील १० खेळाडू हाताची घडी घालून उभे होते, फक्त…; असा मान आजवर कोणाला मिळाला नाही
सचिनच्या त्या एका शतकाने पुढील दोन दशके देशातील अनेक युवकांना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला २८५ धावांचे आव्हन दिले होते. तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किमान २५४ धावा करायच्या होत्या. जर भारताने इतक्या धावा केल्या नसत्या तर न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचला असता.

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणी करू शकले नाही; धोनीच्या नावावर झाला वर्ल्ड रेकॉर्ड

कोका कोला कपमधील सहाव्या लढतीत तेव्हा २५ वर्षीय सचिन तेंडुलकरने ९ चौकार आणि ५ षटकारांसह १४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ बाद २८४ धावा केल्या. वाळूच्या वादळामुळे भारताला ४६ षटकात २७६ धावांचे सुधारीत टार्गेट देण्यात आले. भारताला ४६ षटकात २४६ धावा करता आल्या आणि सामना २६ धावांनी गमावला. पण सचिनच्या वादळी खेळीने भारत अंतिम फेरीत (२३८ धावा) पोहोचला होता.

स्टार ठरला सुपर फ्लॉप; टीम इंडियात स्थान मिळवायचे होते आता IPL टीममधून हकालपट्टी होणार
इतक नाही तर त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २४ एप्रिल रोजी आपल्या २५व्या वाढदिवसा दिवशी सचिने अंतिम सामन्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची धुलाई केली. फायनलमध्ये सचिनने १३४ धावांची शतकी खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करत देशाला कोका कोला कप जिंकून दिला.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here