नवी दिल्ली:हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ च्या हंगामात आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करत आहे. या मोसमात आतापर्यंत त्यांची सुरुवात चांगली झाली आहे. संघाने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. मात्र, आतापर्यंत हा संघ गेल्या हंगामाप्रमाणे लयीत दिसलेला नाही. त्यामुळे आता गुजरातसाठी तणाव वाढला आहे. पुढील काही सामन्यांमध्ये त्याला आपल्या एका गोलंदाजाची उणीव भासणार आहे. कारण हा खेळाडू आयपीएलच्या मध्यातच अचानक काही सामने खेळणे बंद करणारा आहे.आयपीएलमध्ये प्रथमच खेळणारा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटलला मायदेशी परतण्याचे आदेश आले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या महत्त्वाच्या वनडे मालिकेसाठी आयर्लंड क्रिकेट बोर्डाने लिटलचा संघात समावेश केला आहे. या मालिकेद्वारे आयर्लंडला थेट एकदिवसीय विश्वचषकात पात्र ठरण्याची संधी चालून आली आहे. याच संधीचे सोने करण्यासाठी संघ कोनतीही तडजोड करणार नाही, त्यामुळे या मॅचविनर गोलंदाजाला पुन्हा मायदेशी जावे लागणार आहे.

LSG vs GT Live Score: पॉवरप्लेमध्ये राहुल-मेयर्सची तुफानी फटकेबाजी, विजयासाठी हव्यात इतक्या धावा
आयर्लंडला मे महिन्यात बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी १४ सदस्यीय संघात जोश लिटलचा समावेश करण्यात आला आहे. ही मालिका आयर्लंडमध्ये खेळली जाणार असून ९ मे पासून सुरू होईल, जी १४ मे पर्यंत चालेल. ही मालिका आयर्लंडसाठी खूप महत्त्वाची आहे. या वर्षाअखेरीस भारतात होणाऱ्या विश्वचषकात त्यांना थेट प्रवेश मिळवायचा असेल तर या संघाला ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकावी लागेल.

अशा स्थितीत देशासाठी जोश लिटल आयपीएल मध्येच सोडून पुन्हा आयर्लंडला जाणार आहे. ५ मे रोजी तो आयर्लंडला रवाना होणार आहे. मात्र, मालिकेनंतर तो पुन्हा भारतात परतणार आहे. मात्र, या काळात तो ३ महत्त्वाचे सामने खेळू शकणार नाही.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

जोश लिटलला गुजरात टायटन्सने लिलावात ४.४ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचा आयपीएलमधला हा पहिलाच हंगाम आहे. त्याने ५ पैकी ४ सामने खेळले असून ३ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. जोश लिटलचा गुजरातने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला आहे आणि काही प्रसंग वगळता तो पहिल्या सत्रात प्रभावी ठरला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here