कोलकाता:टीम इंडियामधून बाहेर असलेल्या धाकड फलंदाजासाठी म्हणजेच अजिंक्य रहाणेसाठी आयपीएल २०२३ खूप छान ठरले आहे. या मोसमात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असून धावांचा पाऊस पाडत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रहाणेचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे, त्याची फलंदाजी बघून आगळेच त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. २३ एप्रिलला ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने KKR विरुद्ध बॅटने अक्षरशः कहर केला. रहाणेने २९ चेंडूत वेगवान फलंदाजी करताना ७१ धावा ठोकल्या. या खेळीनंतर रहाणेने आपल्या वक्तव्यावरून स्पष्ट केले आहे की, आयपीएलमध्ये जाऊन पुढे काहीतरी वादळी खेळी अनुभवयाला मिळणार आहे.चेन्नई विरुद्ध कोलकाताच्या सामन्यानंतर रहाणेने आपल्या कामगिरीबद्दल सांगितले की, “माझं फक्त स्पष्ट एक माइंडसेट होतं. जर तुमचं मन स्थिर आहे तर तुम्ही ठीक आहेत. मी फक्त माझ्या खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे. विकेट थोडी स्टिकी होती, पण एकदा तुम्ही आत आलात की तुमच्याकडे चांगली संधी असते.”

सचिन…नाम तो सुना होगा! ज्यांच्याशी नेहमीच घेतलाय भारताने पंगा त्याच देशाकडून सचिनला मोठी भेट
पिक्चर अभी बाकी हैचेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत २३५ धावा केल्या. संघाची पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात झाली. याबाबत रहाणे म्हणाला की, “आम्ही चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर मला माझे शॉट्स खेळायचे होते आणि लय कायम ठेवायची होती. मी माझ्या आतापर्यंतच्या सर्व डावांचा आनंद लुटला आहे, मला अजूनही वाटते की माझी सर्वोत्तम खेळी येणे अजून बाकी आहे.”

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

रहाणे या मोसमात उत्कृष्ट फॉर्मात

IPL 2023 मध्ये रहाणेच्या बॅटवर धावांचा पाऊस पडत आहे. रहाणेने पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध ६१ धावांची शानदार खेळी केली होती. या सामन्यात अजिंक्यने आयपीएलमधील पहिले सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये २०९ धावा केल्या आहेत. त्याने गेल्या सामन्यात कोलकाताविरुद्ध केवळ २९ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या आणि आपल्या संघाला ४९धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here