मुंबई : बापावर मुलीचं सर्वात जास्त प्रेम असतं असं म्हणतात. हे नातं फारच हळवं आणि भावूक असतं. या सर्व गोष्टी साराने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी शेअर केलेल्या पोस्टवरून समजता येऊ शकतं. सचिनचा आज ५० वा वाढदिवस. त्यामुळे त्याला जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. पण त्याच्या लाडक्या लेकीने आपल्या या बाबाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.सचिन आणि साराचं नातं खास आहे. सचिन कर्णधार असताना फक्त एकच मोठी स्पर्धा जिंकला आणि ती म्हणजे सहारा चषक. जी पाकिस्तानविरुद्ध खेळवली जायची. सचिनने जेव्हा स्पर्धा जिंकली त्यामुळेच सारा हे नाव तिला ठेवण्यात आले, असे म्हटले जाते. त्यामुळे सचिनचे यश आणि सारा यांचाही संबंध आहे. सचिनने आपले यश आणि सारा यांची सांगड घातल्याचेही पाहायला मिळते. सचिनही साराबाबत जास्तच भावूक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे या दोघांमध्ये एक भन्नाट केमिस्ट्री आहे, असे म्हटले जाते.

सचिनचा आज ५० वा वाढदिवस असताना साराने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. साराने ही पोस्ट तिच्या स्टेटसला ठेवली आहे. या पोस्टमधील फोटो बोलके आहेत. हे सर्व फोटो सारा लहान असतानाचे आहेत. या फोटोंवरून साराचे बालपण कसे गेले आणि सचिनचा तिच्यावर किती जीव आहे, हे या फोटोतून पाहायला मिळते. सारा जेव्हा लहान होती तेव्हा सचिन जगातील सर्वात बिझी माणूस असावा. पण तरीदेखील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सचिन आपल्या कुटुंबियांसाठी आणि खासकरून सारासाठी वेळ काढायचा. त्यामुळे लहानपणाच्या या आठवणींना साराने यावेळी उजाळा दिला आहे.

sara-sachin

साराने बी पोस्ट आपल्या इंस्टाग्रामला शेअर केली आहे. सारा आणि सचिन यांचे वेगवेगळ्या इमोशन्सचे फोटो यावेळी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या सर्व फोटोंमधून साराचे बालपण उलगडताना पाहायला मिळत आहे. कदाचित साराच्या या आठवणी अजूनही ताज्या असतील. त्यामुळे तिला हे फोटो आवडले असतील.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

साराच्या चाहत्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे आणि तिने आपल्या स्टेटसला ही पोस्ट ठेवत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here