मुंबई:ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी मंगळवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ७ जूनपासून इंग्लंडच्या ओव्हर मैदानावर विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढेल. WTC फायनलसाठी भारतीय कसोटी संघात मोठ्या कालावधीनंतर अजिंक्य रहाणेचे कमबॅक झाले आहे.अजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून धमाकेदार कामगिरी करत आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती. अजिंक्यने भारताकडून अखेरची कसोटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी २०२२ मध्ये खेळली होती. खराब कमगिरीमुळे आधी अजिंक्यला उपकर्णधारपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्याने संघातील स्थान देखील गमावले.

WTC फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा, IPLमधील धमाक्याने अजिंक्यने मिळवली कसोटी संघात जागा
भारतीय संघातून बाहेर झाल्यावर अजिंक्यने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. अजिंक्यची कामगिरी पाहून निवड समितीने त्याला या महत्त्वाच्या मॅचसाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे.

IPLच्या आधी केला होता धमाका

अजिंक्य सध्या आयपीएलमधील स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आला असला तरी त्याआधी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. या वर्षी दुलीप ट्रॉफीत अजिंक्यने ३ शतकं तर रणजी ट्रॉफीत एक द्विशतक झळकावले होते. या दोन्ही स्पर्धेत त्याच्या धावा ६३४ इतक्या होत्या. त्याच बरोबर आता आयपीएलमध्ये त्याने वादळी फलंदाजी केली आहे.

उत्साह अंगलट आला, विराट कोहलीने मैदानात केली मोठी चूक; विजयानंतर झाली मोठी कारवाई
अजिंक्य प्रमाणेच याआधी चेतेश्वर पुजाराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात कमबॅक केले होते. त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत संधी दिली होती. पुजाराने फक्त ४ महिन्यात काउंटी क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते.

सर्वांचा बाप निघाला अजिंक्य रहाणे; बॅटिंग बघून गोलंदाजांच्या मनात आला निवृत्तीचा विचार
निवड सोपी नव्हती

अर्थात अजिंक्यची निवड होणे तितके सोपे नव्हते. मधळ्या फळीत सरफराज खान, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावाची चर्चा होती. सरफराज खान हे नाव बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत. पंत आणि अय्यर यांच्या दुखापतीमुळे सरफराजच्या नावावर विचार झाला होता.

वनडे संघात स्थान मिळेल का?

अजिंक्य ज्या पद्धतीने आयपीएल २०२३ मध्ये फलंदाजी करतो ते पाहता त्याने कसोटी सोबत वनडे संघात देखील दावेदारी केल्याचे दिसते. कसोटी प्रमाणे अजिंक्यला वनडे संघात इतक्या सहजपणे संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अजिंक्यने भारताकडून २०१८ साली अखेरची वनडे खेळली होती.

क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here