Kapil Sibal : दिल्लीच्या जंतर मंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन आजही सुरुच आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) पुढे आले आहेत. न्यायाचे सैनिक तुमच्यासोबत आहेत असं ट्वीट सिब्बल यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत मी सोबत असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे.  

Bhupinder Singh Hooda: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचाही पाठिंबा

सिब्बल यांच्याशिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा जाहीर केला आहे. हे खेळाडू आपल्या देशाची शान असल्याचे हुड्डा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण जगात प्रत्येक वेळी त्यांनी देशाचा झेंडा फडकवला असल्याचे हुड्डा म्हणाले. महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. या याचिकेवर 28 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, विनेश फोगटसह सात महिला कुस्तीपटूंनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

 

news reels Reels

 कुस्तीपटू आंदोलनावर ठाम 

दरम्यान, य कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्टीपटूंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशीही कुस्तीपटू आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.  जानेवारी महिन्यातही बृजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी कुस्तीपटूंशी बोलल्यानंतर क्रीडा मंत्रालयानं मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली एक देखरेख समिती स्थापन केली होता. आरोपांवरील तपासासोबतच या समितीला कुस्ती संघटनेचे दैनंदिन कामकाज पाहायचे होतं.

FIR नोंदवण्यास पोलिसांचा नकार, कुस्टीपटूंचा आरोप

चार दिवसांपूर्वी (21 एप्रिल) बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप खेळाडूंनी केला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरु केले आहे.   दिल्ली पोलिसांकडे ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआरची तक्रार देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी मात्र, एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. दरम्यान, बृजभूषण शरण सिंह हे WFI अध्यक्ष म्हणून 12 वर्षापासून काम करत आहेत. त्यांनी 7 मे रोजी होणारी WFI ची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु



sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here