भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्टला आयोद्धा येथे राम मंदिराचे भूमी पुजन केले. या भूमी पुजनानंतर आता वातावरम चांगलेच तापलेले पाहायला मिळत असून राजकारणही चांगलेच रंगायला सुरुवात झाली आहे. आता तर मोदी यांच्या विरोधकांन डिवचण्याचे उद्योगही सुरु झाले आहेत.

भारतातील राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती अखेर पाच ऑगस्ट झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची कोनशिला स्थापन केली. पण आयोध्यामध्ये केलेले काम हा फक्त ट्रेलर आहे आणि अजून बरेच काही काम करायचे बाकी आहे, असा एक मेसेज त्यादिवशी देशभर फिरत होता.

मोदी यांची बाजू घेण्यासाठी आणि त्यांच्या विरोधकांवर टीका करण्यासाठी भारताची महिला कुस्तीपटू व भाजपाची नेता बबिता फोगट ही नेहमीच आघाडीवर असते. आताही मोदी यांच्या विरोधकांना बबितानेच डिवचल्याचे पाहायला मिळत आहे.

बबिताने एक पोस्ट ट्विटरवर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने मोदी यांच्या टीकाकारांना चांगलेच डिवचले आहे. या पोस्टमध्ये बबिताने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मोदी यांनी भूमी पुजन केल्याची एक शिळा लावण्यात आली आहे. या शिळेचा फोटो बबिताने ट्विट केला आहे. त्याचबरोबर बबितताने या ट्विटमध्ये, ” राम मंदिराचे भूमी पुजन करताना शिळा ही फक्त आयोध्येमध्ये ठेवलेली नाही, तर बऱ्याच जणांच्या छातीवरही ठेवली आहे.”

गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झाली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या.

तब्बल २ लाख ७५ हजार विटांतील १०० विटांवर ‘जय श्रीराम’ असं कोरलेलं आहे. यातील नऊ विटा पूजेत सामील करण्यात आल्या आहेत. मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल हेदेखील पूजेसाठी उपस्थित होते. दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here