अहमदाबाद:आयपीएल २०२३ स्पर्धेचा निम्मा टप्पा पार झाला आहे. प्रत्येक संघाच्या ७ लढती झाल्याअसून चेन्नई सुपर किंग्ज अव्वल स्थानी तर दिल्ली कॅपिटल्स सर्वात तळाला आहे. स्पर्धेत काल मंगळवारी पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला.आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव घेतले जाते. त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळून दिले आहे. तर विजयाच्या टक्केवारीचा विचार करता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा सर्वात यशस्वी मानला जाते. आता गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने धोनीला मागे टाकात सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान मिळवला आहे.

IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या पराभवातही अर्जुन तेंडुलकरचे कौतुक; करिअरमध्ये प्रथमच…
मुंबईचा ५५ धावांनी पराभव केल्यानंतर टक्केवारीचा विचार करता किमान २० सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमध्ये हार्दिक पंड्या अव्वल स्थानी असून त्याने २१ पैकी १५ सामन्यात विजय तर ५ मध्ये पराभव स्विकारला आहे. त्याच्या विजयाची टक्केवारी ७५ इतकी आहे. मुंबईवरील विजयासह गुजरातने गुणतक्त्यात ७ पैकी ५ विजयासह १० गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे.

जगातील एकाही खेळाडूला शक्य झाले नाही ते अजिंक्यने करून दाखले; IPLमधून थेट कसोटी संघात
या यादीत धोनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयाची टक्केवारी ५८.९९ इतकी आहे. धोनीने २१७ पैकी १२८ सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या यादीत रोहित शर्माचा समावेश पहिल्या ५ मध्ये देखील नाही. रोहितच्या विजयाची टक्केवारी ५६.०८ इतकी आहे. रोहितने १४९ पैकी ८३ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. रोहितच्या पुढे सचिन तेंडुलकर, स्टीव्ह स्मिथ, अनिल कुंबळे, ऋषभ पंत आणि शेन वॉर्न हे कर्णधार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here