क्रिकेट विश्वातील सर्वात चांगल्या अंपायरमध्ये यांचा समावेश होतो. २००४ ते २००८ या पाच वर्षात आयसीसीचा ऑफ द इअर हा पुरस्कार त्यांनी मिळवला होता. पण या सर्वोत्तम अंपायरकडून देखील चूका झाल्या आहेत. टॉफेल यांनी २०१२ साली निवृत्ती घेतली.
वाचा-
टॉफेल यांनी गौरव कपूरच्या प्रसिद्ध पॉडकास्ट कार्यक्रम २२ यार्न्स पॉडकास्ट होस्टेड बाय गौरव कपूर या मध्ये बोलताना सचिनबद्दल केलेल्या एका मोठ्या चुकीबद्दल सांगितले.
भारत आणि इंग्लंड २००७ ट्रेंट ब्रिज येथे कसोटी सामन्यात सचिन ९१ धावांवर खेळत होता. पॉल कॉलिंगवूडने चेंडूवर अपिल केली आणि मी सचिनला बाद दिले. सचिन या निर्णयामुळे नाराज होता. तो काही वेळ तसाच थांबला होता. नंतर बॉल ट्रॅकिंग स्क्रीनवर स्पष्टपणे दिसत होते की, चेंडू विकेटपासून फार लांब जात होता, असे टॉफेल म्हणाले.
वाचा-
हे स्पष्ट होते की मी निर्णय घेण्यास चुको होतो. मला कल्पना होती क्रिकेट विश्वात यावर प्रतिक्रिया येणार. त्यानंतर मी क्रिकइन्फो आणि वृत्तपत्रे वाचले नाही. पुढील महिनाभर मी माध्यमांच्या नजरेत असणार याची मला कल्पना होती.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मी मैदानावर सचिनला भेटलो आणि त्याच्या मोकळेपणाने चर्चा केली. मी काल चुकीचा निर्णय दिला. त्यावर सचिन म्हणाला, तुम्ही एक चांगले अंपायर आहात. तुम्ही वारंवार चुका करत नाही. याबाबत काळजी करू नका.
मी सचिनकडे माफी मागत नव्हतो. फक्त चांगले वाटावे म्हणून बोलत होतो आणि एकमेकांचे काम चांगले करता यावे यासाठी ती चर्चा महत्त्वाची होती. या चर्चेनंतर आमचा दोघांचा एकमेकांविषयीचा आदर आणखी वाढला, असे टॉफेल म्हणाले.
अर्थात मी फक्त सचिला एकदाच चुकीचे बाद दिले नाही. त्यानंतर देखील एक-दोन वेळा माझ्याकडून सचिनबाबत चुका झाल्या. पण यामुळे आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times