नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी तिच्या बेताल वक्तव्यामुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. कधी न्यूड फोटो तर कधी डान्सचे व्हिडिओ शेअर केल्यामुळे हसीनाला युझर ट्रोल करत असतात. आता मात्र हसीनाला कट्टरवाद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

वाचा-
पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत निर्माणाला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराची कोनशिला स्थापन केली. त्यानंतर हसीनने एक राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली.

राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या आणि आनंद व्यक्त केला होता. पण हसीनाने केलेल्या पोस्टवर कट्टरवाद्यांना राग आला. प्रथम या पोस्टवरून तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिला धमकी देण्यास सुरूवात झाली.

वाचा-
सोशल मीडियावरून येणाऱ्या धमक्यांना कंटाळून अखेर हसीनाने इस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून मदत मागितली.

हसीना आणि क्रिकेटपटू यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. यावरून तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

वाचा-

काय पोस्ट केली होती हसीनाने

” समस्त हिंदू समाजाचे श्री राम मंदिरचे भूमी पुजन झाल्याबद्दल अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्व देशवासियांनी एकत्र येऊन भाईचारा दाखवावा आणि भारताला जगापुढे विश्व शक्ती बनवावे.”

वाचा-

हसीनने यापूर्वी मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर शमीच्या भावाने माझ्यावर रेप केल्याचेही सांगितले होते. त्यामळे चाहते हसीनवर नाराज झाले आहेत. काही जणांनी तिला जीवे मारण्याची आणि रेपची धमकी देण्यात आली आहे.

वाचा-
राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर कैफने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कैफ म्हणाला की, ” अलाहाबाद या शहरात मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे या शहराची संस्कृती मला चांगलीच माहिती आहे. ही संस्कृती गंगा-जमुना यांची आहे. मला रामलीला पाहणे फार आवडते आणि मी त्याचा चाहता आहे. भगवान राम हे प्रत्येक माणसामधील चांगले गुण पाहायचे. त्यामुळे त्यांचे हे विचार आपण पुढे न्यायला हवेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जी लोकं द्वेष किंवा तेढ निर्माण करतात त्यांना प्रेम आणि एकताच्या मार्गावर येण्याची परवानगी देऊ नये.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here