सध्याच्या घडीला करोनाच्या काळात ट्वेन्टी-२० लीगला सुरुवात करण्यात आली आहे. या लीगच्या फायनलचा सामना चाहत्यांना १६ ऑगस्टला पाहता येणार आहे. या लीगचे लाईव्ह सामने नेमके कुठे पाहायला मिळणार, पाहा…

शनिवारी एका ट्वेन्टी-२० लीगला सुरुवात झाली आहे. ही लीग ९ दिवस चालणार आहे. या लीगच्या पहिल्या सामन्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कारण जवळपास पाच महिन्यानंतर चाहत्यांना ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने पाहता आलेले नाहीत. त्यामुळे चाहत्यांनी या लीगला चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे.

ही ट्वेन्टी-२० लीग रंगणार तरी कुठेकरोनाच्या काळात ही ट्वेन्टी-२० लीग रंगणार तरी कुठे, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. ही ट्वेन्टी-२० लीग आफ्रिका खंडात रंगणार आहे. ही ट्वेन्टी-२० लीग रंगणार आहे टांझानियामध्ये. अॅडवान्स प्लेअर्स ट्वेन्टी-२० लीग, असे या स्पर्धेचे नाव आहे. या लीगमधील कामगिरीच्या जोरावरच राष्ट्रीय संघ निवडण्यात येणार आहे. या लीगचे लाईव्ह सामने कुठे पाहता येणार, पाहा…

लाईव्ह सामना कुठे पाहता येणार….अॅडवान्स प्लेअर्स ट्वेन्टी-२० लीग तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे. ही लीग gifincric.com या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे. भारतामध्ये टीव्हीवर या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवता येणार नाही. त्यामुळे वरील वेबसाईटवर चाहत्यांना लाईव्ह सामने पाहता येणार आहे.

करोनाच्या काळात बीसीसीआयनेही आयपीएलसाठी कंबर कसलेली आहे. यावर्षी आयपीएलला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी काही लीग सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना आयपीएलपूर्वी काही ट्वेन्टी-२० सामने पाहायला मिळणार आहे.

आयपीएल खेळण्यासाठी खेळाडूंना युएईमध्ये नेण्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या दोन करोना चाचण्या घेण्यात येणार आहे. जर या दोन्ही चाचण्यांमध्ये खेळाडू निगेटीव्ह सापडला तरच त्याला युएईला जाता येणार आहे. पण त्यावेळ किंवा युएईमध्ये पोहोचल्यावर खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला तर बीसीसीआयचे धाबे दणाणले जाऊ शकतात.

खेळाडू जरी करोना निगेटीव्ह सापडले तरी भारतामधूल किती खेळाडूंना आयपीएल खेळवण्यासाठी युएईमध्ये नेण्यात येऊ शकते, याबाबत बीसीसीआयने एक नियम बनवला आहे. आतापर्यंत प्रत्येत संघात जवळपास ३० खेळाडू असल्याचे पाहिले गेले आहे. पण तीन खेळाडूंना युएईमध्ये नेया येऊ शकणार नाही, असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार आता फक्त २४ खेळाडूंना युएईमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी नेण्यात येऊ शकते. त्यानुसार आयपीएच्या संघांना आपल्या संघात फक्त २४ खेळाडू ठेवता येतील, पण बाकीच्या खेळाडूंना मात्र त्यांना आता संघाबाहेर काढावे लागणार आहे. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूंना संघाबाहेर काढायचे, हा प्रश्न संघ मालकांपुढे पडलेला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here