भारतीय क्रिकेट संघातील फिरटीपटू युजवेंद्र चहलचा साखरपुडा झाला असून त्याने सोशल मीडियावर भावी पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यानंतर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने चहलला खास शुभेच्छा दिल्या आहेत, पण या शुभेच्छा देताना त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे. सेहवागने चहलला शुभेच्छा देताना मोदी यांचा फोटो का वापरला, पाहा…

चहलच्या भावी पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे. धनश्री एक डॉक्टर असल्याचे समजते. त्याच बरोबर तिचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे. लॉकडाउनच्या काळात धनश्री आणि चहल झूम वर्कशॉप्समध्ये एकत्र दिसले होते. युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर भावी पत्नीसह सोशल मीडियावर फोटो शेअर केलाय. चहलने फोटो शेअर करताना, आम्ही हो म्हटले आहे. आमच्या कुटुंबासोबत, असे म्हटलय. चहलने ही आनंदाची बातमी दिल्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय संघातील सहकारी चहलला शुभेच्छा देत आहेत.

चहलने साखरपुडा केल्यावर सेहवागने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना सेहवागने मोदी यांचा फोटो वापरला आहे. या फोटोमध्ये मोदी यांच्या फोटोवर, ‘आपदा को अवसर में बदलना हैं…’ असं लिहिले आहे. मोदी यांच्या फोटोखाली सेहवागने चहलच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छआ दिल्या आहेत.

सध्याच्या घडीला जगभरात करोनाचे संकट आहे. या संकट काळात कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये, हा प्रत्येकाचा विचार आहे. पण या करोनाच्या काळात मोदी यांनी राम मंदिराचे भूमी पुजन केले होते. त्यांनी या संकटाच्या काळात सकारात्मक वृत्ती दाखवली आणि राम मंदिराचे भूमी पुजन केले. तसेच चहलनेही या करोनाच्या काळात सकारात्मकपणा दाखवला आणि आपल्या घरातील एक मंगल कार्य केले. त्यामुळे सेहवागने चहलला शुभेच्छा देताना मोदी यांचा फोटो वापरल्याचे पाहायला मिळत आहे.

करोना काळात चहल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होता. त्याने शेअर केलेल्या जवळ जवळ प्रत्येक पोस्टवर बातमी होत होती. आता लवकरच १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत तो खेळताना दिसणार आहे. आयपीएल नंतर हे दोघे विवाहबद्ध होण्याची शक्यता आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here