लखनौ: आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी लखनौ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत झाली. ही लढत RCBने १८ धावांनी जिंकली. दोन्ही संघातील ही लढत चुरशीची झाली, पण सामना झाल्यानंतर चर्चा सुरू झाली ती मैदानावरील खेळाची नाही तर मैदानावर झालेल्या राड्याची होय.विराट कोहली आणि लखनौचा कोच गौतम गंभीर यांच्यात मॅच झाल्यानंतर जोरदार बाचाबाची झाली. दोघात हाणामारी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या वादाची सुरुवात मॅच सुरू असताना झाली होती. अफगाणिस्तानचा मध्यम गती गोलंदाज नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला.
लखनौचा संघ विजयासाठी फक्त १२७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरला होता. पण पॉवर प्लेमध्येच त्यांचा पराभव निश्चित झाला होता. लखनौने ५.१ षटकात २७ धावांवर ४ तर ६.६ षटकात ३८ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाची ही अवस्था झाल्यावर विराट कोहलीने फलंदाजांना चिडवण्याचे काम सुरू केले. यात विराट आणि नवीन यांच्यात बाचाबाची झाली. मॅच झाल्यानंतर देखील भेट घेताना दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा या प्रकरणात गौतम गंभीरने उडी घेतली. मैदानावरील या राड्यानंतर तिघांवर कारवाई करण्यात आली.

मैदानावर जे झाले ते कमी की काय म्हणून आता सोशल मीडियावरून या खेळाडूंनी वाद सुरू ठेवला आहे. विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टेटस ठेवला आहे. त्याने एक सुविचार पोस्ट केला आहे. त्यात म्हटले आहे की, आपण जे काही ऐकतो, ते एक मत असते, सत्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक संदर्भ असतो, सत्य असतेच असे नाही. विराटला नेमके काय म्हणायचे आहे हे सर्वांना कळाले.
अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हकने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तो म्हणतो ‘YOU GET WHAT YOU DESERVE THATS HOW IT SHOULD BE AND THATS HOW IT GOES’ (तुम्हाला तेच मिळते, जेवढी तुमची पात्रता आहे. असेच झाले पाहीजे आणि असेच होते)
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More