नवी दिल्ली: सध्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडण चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. या सामान्यातच एकचं नाही तर २-३ भांडणं पाहायला मिळाली. विराट कोहली सोमवारी झालेल्या या सामन्यात चांगलाच आक्रमक दिसून येत होता. त्याची आक्रमकता खेळताना आणि मैदानात वावरताना कायम दिसून येते. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा सामना आता कमी धावसंख्येचा म्हणजेच १२६ धावांचा होता. बंगलोरच्या संघाने या सामन्यात लखनौला विजयासाठी १२७ धावांचे थोडके आव्हान दिले होते. पण त्यांची फलंदाजी फळी कोसळल्याने संघाला मोठ फटका बसला आणि १०८ धावांवर लखनौचा डाव आटोपला. बँगलोरने हा सामना शानदार पद्धतीने जिंकला खरा पण विराट आणि गंभीर यांच्यातील भांडणामुळे आणि या गोष्टींमुळे सामना बाजूलाच राहिला आणि त्यांचे भांडण चर्चेचा विषय ठरला.क्रिकेटच्या मैदानात अशाप्रकारचे भांडण होणे ही गोष्ट नक्कीच चुकीची आहे. पण गौतम गंभीर आणि विराट कोहलीचं हे भांडण आता मुंबई इंडियन्सचाय चांगलंच पथ्यावर पडणार आहे. मुंबई इंडियन्स यंदाचे आयपीएल जेतेपद जिंकण्याच्या एक पाऊल पुढे गेली आहे. कारण असं म्हटलं जातंय की जेव्हा ज्वेह गौतम गंभीर आणि विराट कोहलीचं भांडण होतं तेव्हा तेव्हा मुंबई इंडियन्स त्या सिझनची आयपीएल ट्रॉफी जिंकते.
याचं जिवंत उदाहरण म्हणजे २०१३ मधील कोहली आणि गंभीरचं भांडण. २०१३ मध्ये तर गौतम गंभीर मैदानात खेळत होता आणि विराट फलंदाजीसाठी होता. त्यावेळेस हे दोघेही आपापल्या संघाचे कर्णधार होते. विराट कोहली आरसीबीचा तर गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. त्यावेळेसही खेळाडूंना आणि पंचांना मध्यस्थी करावी लागली होती. यंदा ज्याप्रमाणे अमित मिश्राने या भांडणात मध्यस्थी केली होतीतेव्हा रजत भाटिया याने गोष्टी वाढण्यापासून रोखल्या होत्या. अमित मिश्रा प्रमाणे रजत देखील दिल्लीचाच आहे. त्यावर्षी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला अंतिम सामन्यात पराभूत करत आयपीएल २०१३ चे विजेतेपद पटकावले.
त्यामुळे आता १० वर्षांनंतर २०२३ मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये भरमैदानात चांगलंच जुंपलं. त्यामुळे यंदाही मुंबई इंडियन्स आयपीएलचे जेतेपद पटकावेल अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ यंदा मागील वर्षीपेक्षा थोडा फॉर्मात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघाने आतापर्यंत ८ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत तर ४ सामने गमावले आहेत. सध्या मुंबईचा संघ ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ३ मे ला पंजाब किंग्जविरुद्ध मोहालीमध्ये होणार आहे. तर त्यानंतर अनुक्रमे चेन्नई, आरसीबी, गुजरात आणि लखनौच्या संघासोबत मुंबईचे सामने असतील. मुंबईला यंदाच्या प्लेऑफमध्ये धडक मारायची असेल तर आपली जबरदस्त कामगिरी कायम राखणे गरजेचे आहे.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More