करोनाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट नुकतेच सुरु झाले आहे. पण अजूनपर्यंत क्रिकेट पूर्वपदावर यायला बराच वेळ लागेल. सध्याच्या घडीला खेळाडू आपल्या घरातच आहेत. पण घरात बसून क्रिकेटपटू आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसांनी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा व्हिडीओ आलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वॉर्नर आणि त्याच्या बायकोने भन्नाट डान्स केला असून हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. कारण चाहत्यांच्या पंसतीला हा व्हिडीओ उतरला असून त्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी वॉर्नरचे व्हिडीओ रोज येत होते, हे व्हिडीओ चांगलेच व्हायरलही होत होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये वॉर्नरचा एकही व्हिडीओ पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे वॉर्नर नेमका आहे तरी कुठे, असा सवाल चाहते विचारत होते. पण आज अखेर वॉर्नरचा एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ आला असून तो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

हिंदी गाणी आणि वॉर्नर यांचे योग्य समीकरण या व्हिडीओमध्ये जुळून येताना दिसत आहे. कारण गाण्याच्या तालावर वॉर्नर आणि त्याच्या पत्नीने भन्नाट डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. पण वॉर्नरचा आजचा हा डान्स आणि व्हिडीओ खास आहे. कारण या व्हिडीओला एक कारण आहे. आज भारतातील महेश बाबू या प्रसिद्ध अभिनेत्याचा वाढदिवस आहे. आज महेश बाबूचा ४५वा वाढदिवस आहे. या गोष्टीचे औचित्य साधून वॉर्नरने हा डान्स बसवल्याचे पाहायला मिळत आहे. कारण वॉर्नरने यावेळी डान्ससाठी महेश बाबूचे ‘माइंड ब्लॉक’ हे गाणे निवडले आहे. त्याचबरोबर वॉर्नर महेश बाबूसारखा डान्स करत असल्याचेही पाहायला मिळाले आहे.

वॉर्नरने मे महिन्यामध्येही महेश बाबूच्या सुपर हिट गाण्यांवर आपला डान्सचा व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ महेश बाबूनेही पाहिला होता आणि त्याला तो चांगलाच आवडला होता. आज महेश बाबूच्या ४५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वॉर्नरने केलेला हा खास व्हिडीओ महेश बाबूला कसा वाटतो, याची उत्सुकता आता चाहत्यांना आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here