लखनौ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या लढतीमध्ये आधी विराट कोहली आणि नवीन यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर विराट आणि गंभीर यांच्यात वाजले. सामना झाल्यानंतर देखील विराट आणि नवीन हे एकमेकांच्या समोर आले होते. या सर्व वादावर आता नवीन उल हकची आर-पारची भूमिका घेतली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नवीनने संघातील एका सहकाऱ्याला सांगितले की, मी भारतात आयपीएल खेळण्यासाठी आलो आहे, कोणाकडून अपशब्द किंवा शिव्या ऐकण्यासाठी नाही.
मॅचमध्ये लखनौची फलंदाजी सुरू असताना विराट आणि नवीन यांच्यात दोन वेळा वाद झाला. प्रथम जेव्हा मर्तबा फलंदाजी करत होता तेव्हा कोहली त्याला स्लेज करताना दिसला. सामना झाल्यानंतर भेटी दरम्यान हे दोन्ही खेळाडू पुन्हा भिडले. या दोन्ही घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवीनने विराट कोहलीला निशाणा करत इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यात तो म्हणतो, तुम्हाला तेच मिळते, जेवढी तुमची पात्रता आहे. असेच झाले पाहीजे आणि असेच होते.
मैदानावरील वादामुळे चर्चेत येण्याची नवीन उल हकची ही पहिली वेळ नाही. २०२० मध्ये लंका प्रीमिअर लीग मध्ये पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीसोबत त्याचा वाद झाला होता. तसेच मोहम्मद आमीर सोबत देखील तो भिडला होता. एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, मला जर कोणी काही बोलले तर मी मागे हटणार नाही. मी लहानपणापासून असाच आहे. ही माझी सवय आहे आणि ते माझ्या DNAमध्ये आहे. जर मी असे म्हटले की उद्यापासून असे वागणार नाही तर ते चुकीचे ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त ७ वनडे आणि २७ टी-२० सामने असे छोटे करिअर असलेल्या नवीनचा आफ्रीदी, आमीर आणि विराट सारख्या दिग्गज खेळाडूंशी वाद झाला आहे. लोकांना वाटते की मी मैदानाबाहेर देखील असाच आहे. पण मी तसा गंभीर नाही. मात्र मैदानावर थोड सिरिअस व्हावे लागते, असे तो म्हणाला.
क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More