नवी दिल्ली: आयपीएलमधील सामन्यापेक्षा सध्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर झालेल्या वादाची चर्चा अधिक आहे. स्टार खेळाडू विराट कोहली, लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन-उल-हक आणि मेंटॉर गौतम गंभीर यांच्यातील आयपीएल २०२३ च्या सामन्यातील भांडण चर्चेत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे माजी क्रिकेटपटू चांगलेच संतापले आहेत. या मुद्द्यावरून पहिले सुनील गावसकर त्यांच्यावरील बंदीवर बोलले, मग अनिल कुंबळेने ते लाजिरवाणे म्हटले आणि आता वीरेंद्र सेहवागनेही धारदार वक्तव्य केले आहे. तो म्हणाला तू आयकॉन आहेस आणि तू असं कसं वागू शकतोस.क्रिकबझसोबतच्या संभाषणात सेहवाग म्हणाला – “सामना पाहिल्यानंतर मी टीव्ही बंद करून झोपलो होतो. मी पाहिले नाही काय झाले? पण सकाळी उठल्यावर सोशल मीडियावर मोठी खळबळ माजल्याचे समजले. जे झाले ते योग्य नव्हते. जो हरला तो गेला तर जो जिंकला त्याने आनंद साजरा करून निघून जावे. तुम्ह मोठे खेळाडू आहात. हे या देशाचे आयकॉन आहेत. जर आयकॉन असं काहीतरी वागतायत तर त्याचा प्रभाव पडणारचं.”

केएल राहुलच्या जागी WTC साठी संघात कोणाला मिळू शकते संधी; ही ३ नावं चर्चेत
बंदीबाबत पुढे बोलताना तो म्हणाला- ” बीसीसीआयची इच्छा असेल तर ते कोणत्याही खेळाडूवर बंदी घालू शकते. तसं झालं तर भविष्यात अशी भांडणं कमी पाहायला मिळतील, कारण फक्त यावेळीच नाही. हे वर्षातून एकदा नक्कीच होते. खेळाडू असोत, सपोर्ट स्टाफ असोत किंवा कोणीही असो, कोणीही हे करू नये. ते चांगले दिसत नाही. बरीच मुलं मॅच पाहतात आणि ही वाईट गोष्ट आहे. मला मुलं आहेत आणि त्यांना बेन स्टोक्सबद्दल माहिती आहे. हे चुकीचे आहे.”

गंभीरने दोन विश्वचषक जिंकले, पण…

दुसरीकडे, मनोज तिवारी गौतम गंभीरवर म्हणाला की, लोक भविष्यात गंभीर पाजीबद्दल त्याच्या आक्रमक वृत्तीबद्दल बोलू शकतात. त्यांना त्याच पद्धतीने ओळखले जात आहे, पण ते चुकीचे आहे. गंभीरने दोन विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, पण असे झाले तर लोक त्याचे कर्तृत्व विसरतील.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने शानदार गोलंदाजी करताना सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सचा १८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ९ बाद १२६ धावा केल्या. यानंतर त्याने लखनौला १९.५ षटकांत १०८ धावांवर बाद केले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here