वाचा-
ब्राझीलमधील एका संघातील १० खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. गोइस या फुटबॉल संघातील १० खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे अखेरच्या क्षणी सामना स्थगित करावा लागला.
वाचा-
गोइस आणि साओ पाउलो एफसी यांच्यात मॅच होणार होती. या सामन्यासाठी स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारली होती. ब्राझीलमधील फुटबॉल सिझनच्या पहिल्या आठवड्यातील अखेरचा सामना होता.
वाचा-
ब्राझीलमध्ये या सीझनमधील फुटबॉलची सुरुवात शनिवारी झाली. करोना व्हायरसमुळे गेल्या तीन महिन्यांपासून फुटबॉल सामना झाला नव्हता. CBFने निश्चित केलेल्या नियमानुसार प्रत्येक खेळाडूची मॅचच्या ७२ तास आधी करोना चाचणी घेणे बंधनकारक होते.
वाचा-
या चाचणीनंतर गोइसच्या दहा खेळाडूंची चाचमी पॉझिटिव्ह आली. गोइस संघाचे संचालक मार्कसेलो अलमीदा यांनी सांगितले की, आमच्या संघातील २३ पैपकी १० खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या चाचणीचे रिपोर्ट आज आले.
खेळाडूंच्या करोना चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर कोर्टाने अखेरच्या क्षणी सामना स्थगित करण्याचा निर्णय दिला. कोर्टाच्या निर्णय आला तेव्हा साओ पाउलो एफसीचा संघ मैदानात वॉर्म अप करत होता. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
वाचा-
सामना स्थगित करण्याचा निर्णय सुपरियर स्पोर्ट्स कोर्ट फॉर फुटबॉलने घेतला जो ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेश (CBF)ने मान्य केला. ब्राझीलमध्ये ३० लाखाहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर यामुळे मृत्यू झालेल्यांची संक्या १ लाखापेक्षा अधिक झाली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times