मोहाली : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएलमधील कालची लढत हाय व्होल्टेज ठरली. पंजाब किंग्जनं मुंबई पुढं २१४ धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबई इंडियन्सचा संघ २१५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरला होता. त्यांची सुरुवात निराशाजनक झाली होती. रोहित शर्मा शुन्यावर बाद झाल्यानंतर इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या वादळी खेळीमुळं मुंबईनं १९ व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. या सामन्यात आणखी एका मराठमोळ्या खेळाडूनं दमदार कामगिरी केली. जितेश शर्मानं २७ बॉलमध्ये नाबाद ४९ धावा केल्या. पंजाबनं २१४ धावा केल्या त्यामध्ये जितेश शर्माची खेळी महत्त्वाची होती.

मुंबई निवड केली पण संधीच दिली नाही अन् त्यानं घाम फोडला

जितेश शर्मानं विदर्भ क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. जितेश शर्माला मुंबईच्या टीमनं २०१६ मध्ये खरेदी केलं होतं. २०१६ ते २०१८ हे तीन हंगाम तो राखीव खेळाडू म्हणून संघात होता. पण, त्याला प्रत्यक्ष मैदानावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नव्हती. मुंबईनं त्याला नंतर करारमुक्त केलं. त्याच जितेश शर्माला पंजाब किंग्जनं संधी दिली. जितेश शर्मानं मिळालेल्या संधीचं यंदाच्या हंगामात सोनं करुन दाखवलं आहे. जितेश शर्मा मुंबई विरुद्धच्या सामन्यात १२ व्या ओव्हरमध्ये मैदानात उतरला. लियाम लिविंगस्टोनच्या साथीनं त्यानं मुंबईला घाम फोडला. जितेशनं त्याच्या वादळी खेळीत २७ बॉलमध्ये २ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४९ धावा केल्या.

मुंबईची पोरं हुश्शार… सूर्या आणि इशानने केली धुलाई, मुंबईने विजयासह घेतला पंजाबचा बदला

जितेश शर्माच्या तीन चौकारांमुळं पंजाबला जोफ्रा आर्चरच्या एका ओव्हरमध्ये २१ धावा मिळाल्या आणि तिथून पंजाबच्या डावाचं चित्र पालटलं. लियाम लिविंगस्टोनच्या साथीनं जितेश वर्मानं पंजाबसाठी ११९ धावांची भागिदारी केली.

मुंबई इंडियन्सला मिळाला नवा स्टार; पदार्पणात धारधार कामगिरी, डेथ ओव्हरमध्ये पाहा केलं तरी काय

२२ एप्रिल रोजी पंजाब आणि मुंबई यांच्यात लढत झाली होती. त्या सामन्यात पंजाबनं विजय मिळवला होता. जितेश वर्मानं त्या मॅचमध्ये ७ बॉलमध्ये ३५७.१४ च्या स्ट्राइक रेटनं २५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्यानं चार षटकार लगावले होते.

जितेश शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत १६५.९७ च्या स्ट्राइक रेटनं २३९ धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या मॅचमध्ये त्यानं १८ चौकार आणि १६ षटकार लगावले आहेत.जितेश शर्मा हा अमरावतीचा असून त्याचा जन्म २२ ऑक्टोबर १९९३ ला झाला आहे.

Mumbai Police : मुंबई इंडियन्सनं मोहालीचं मैदान मारलं, मुंबई पोलिसांनी पंजाबला डिवचलं, अर्शदीपचा फोटो ट्विट

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here