रोहित शर्मा आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर आउट होणार खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा शून्यावर आउट होण्याची ही १५वी वेळ आहे. रोहित शर्माशिवाय सुनील नेरन, मंदीप सिंह आणि दिनेश कार्तिकही आयपीएलमध्ये १५-१५ वेळा शून्यावर आउट झाले आहेत.
रोहित शर्मा बुधवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात शून्यावर आउट झाला होता. रोहित शर्माला पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ऋषि धवनने मॅथ्यू शॉर्टच्या हातून कॅट आउट करत शून्यावर पवेलियन पाठवलं होतं.
रोहित शर्माच्या चाहत्यांनाही बसणार नाही विश्वास
आयपीएलच्या इतिहासात अम्बाती रायडू १४ वेळा शून्यावर आउट होऊन दुसऱ्या स्थानी आहे. अजिंक्य रहाणे, पीयूष चावला, पार्थिव पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि हरभजन सिंह, मनीष पांडे हे १३ वेळा शून्यावर आउट होऊन संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, ईशान किशन (७५) आणि सू्र्यकुमार यादव (६६) या दोघांच्या आक्रमक भागीदारीच्या मदतीने मुंबई इंडियन्सने बुधवारी आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्सचा सहा विकेटने पराभव केला.
विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानातच भिडले; मोठी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आउट झालेले फलंदाज
रोहित शर्मा – १५, दिनेश कार्तिक – १५, मंदीप सिंह – १५, सुनील नरेन – १५, अंबानी रायडू – १४, पीयूष चावला – १३, हरभजन सिंह – १३, अजिंक्य रहाणे – १३, पार्थिव पटेल – १३, मनीष पांडे -१३, ग्लेन मॅक्सवेल – १३, राशिद खान – १२
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More