चीनच्या विवो या कंपनीने आयपीएलचे या वर्षीचे प्रायोजकत्व काढून घेतले आहे. त्यामुळे आयपीएल तोंडावर आल्यावर बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न पडला आहे. आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी आता काही कंपन्यांची नावे पुढे येत आहेत. पण आता कोणत्या कंपनीला प्रायोजकत्व द्यायचे, यासाठी बीसीसीआयने आता एक महत्वाची अट ठेवल्याचेही पाहायला मिळत आहे.

वाचा-

चीनच्या विवो या कंपनीने आयपीएल रद्द केल्यावर आयपीएलसाठी या वर्षी अमेझॉन, ड्रीम ११, बायजूज, रिलायन्स जिओ आदी कंपन्या स्पर्धेत असल्याचे समजते. आता या कंपन्यांसोबत योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली कंपनीचा देखील समावेश असल्याचे कळते. कंपनीने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही पतंजलीला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. त्यामुळेच आयपीएलचे प्रायजोकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजारावाला यांनी सांगितले.

आता नेमक्या कोणत्या कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व द्यायचे, याबाबत बीसीसीआयने काही नवीन नियम बनवले आहेत. त्याचबरोबर एक महत्वाची अटही ठेवलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. जर चीनच्या कोणत्या कंपनीने पुन्हा एकदा प्रायोजकत्व मिळवलं तर आयपीएलवरून लोकांचा विश्वास उठेल, असे म्हटले जात आहे. त्यासाठी बीसीसीआयने एक महत्वाची अट आता ठेवलेली आहे.

वाचा-

आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले की, ” विवो या कंपनीने आयपीएलबरोबरचा करार रद्द केला आहे. पण या गोष्टीचा कोणताही विपरीत परीणाम आयपीएलवर होणार नाही. कारण बीसीसीआय आणि आयपीएल यांनी आपले नाव कमावलेले आहे. त्यामुळे आयपीएलला हा करार रद्द केल्याचा कोणताही परीणाम होणार नाही. यावर्षी आयपीएलचे प्रायोजकत्व कोणत्या कंपनीकडे असेल, हे लवकरच सर्वांपुढे येईल.”

वाचा-

आयपीएलच्या प्रायोजकत्वाबाबत बीसीसीआयने एक नवीन अट ठेवली आहे. ज्या कंपनीचा टर्नओव्हर हा ३०० कोटींपेक्षा जास्त असेल त्याच कंपनीला आता आयपीएलच्या प्रायोजकत्वाच्या शर्यतीत कायम राहता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय समोरील काही प्रश्न सुटल्याचे पाहायला मिळत असून येत्या काही दिवसांतच आयपीएलचा नवा प्रायोजक कोण असेल, हे सर्वांसमोर येणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here